मोबाईल की बॉम्ब ?

मोबाईल कधी काळी चैनीची असणारी ही वस्तु आज प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येक हातात दिसू लागली.. नवं नवे मोबाईल आणि मोबाईलमधलं नव नव तंत्रज्ञान यामुळे प्रत्येकाला नव्या मोबाईलचा हव्यास वाढू लागलाय.. त्या मोबाईलच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक मर्यादा जाणीव होते आणि अशावेळी सर्वसामान्य ग्राहकांची नजर जाते ती चायना मोबाईलवर.. पण स्वस्ताईच्या नादात घेतले जाणारे हे चायना मोबाईल आज बॉम्ब ठरत आहेत.

Updated: Jul 10, 2012, 10:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मोबाईल की बॉम्ब ?

चायना मोबाईलनं विद्रुप केला चिमुकल्याचा चेहरा

चायना मोबाईलचा वाढता धोका !

स्वस्ताईचा मोह ठरेल प्राणघातक !

 

मोबाईल कधी काळी चैनीची असणारी ही वस्तु आज प्रत्येक घराघरात नाही तर प्रत्येक हातात दिसू लागली.. नवं नवे मोबाईल आणि मोबाईलमधलं नव नव तंत्रज्ञान यामुळे प्रत्येकाला नव्या मोबाईलचा हव्यास वाढू लागलाय.. त्या मोबाईलच्या वाढत्या किमतींमुळे आर्थिक मर्यादा जाणीव होते आणि अशावेळी सर्वसामान्य ग्राहकांची नजर जाते ती चायना मोबाईलवर.. पण स्वस्ताईच्या नादात घेतले जाणारे हे चायना मोबाईल आज बॉम्ब ठरतात.. यावरच प्राईममध्ये घेतलेला वेध, मोबाईल की बॉम्ब?

 

बाजारात कितीही मंदिचे सावट असलं तरी, मोबाईलचा बाजार नेहमीच गरम असतो.. आणि त्यातही चायना मोबाईलला फार मागणी आहे. बाजारात हजार ते बाराशे रुपयांत मिळणा-या या चायना मोबाईलकडे ग्राहकांची मागणीही मोठी असते. पण असच स्वस्त मोबाईल म्हणतेल्या एक चायना मोबाईल नागपूरच्या मयूर राऊतचं आयुष्य उध्वस्त करुन टाकल आहे.

 

नागपूरचा हा मयूर राऊत.. काही दिवसापर्यंत गोंडस असणारा हा चेहरा एका दुर्घटनेमुळे पुर्णपणे विद्रुप झालाय़... तुमच्या मनात प्रश्न येईल कोण तो माणूस ज्यानं देवानं बनवलेला या सुंदर चेह-याला जखमी करण्याचे धाडस केलय.. पोलिसांनी त्याला शिक्षा केलीय का.. अगदी कुणालाही मनात प्रश्नांचे काहूर उठेल इतपत गंभीर परिस्थीती निर्माण करणारा हा मयूरचा चेहरा आणि मयुरच्या या दुर्देवी परिस्थीतीस कारणीभुत ठरलाय तो एक चायना मोबाईल...(इमेज टाकणे ) होय तुमचा विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट अगदी सत्य आहे.. याच चायना मोबाईलनं क्षणात मयुरचा चेहराचं नव्हे तर अवघ्या देहावर जखमांचं दान दिलं आहे.

 

अवघ्य़ा १२ वर्षाच्या या मयूर राऊतला आपल्या हातातला मोबाईल क्षणात आपल्या प्राणांचा वैरी होईल याची सुतरामही कल्पना नव्हती.. पण चार्जींगपासून मोबाईल काढून घेतो काय क्षणात एक मोठा स्फोट होतो काय, सारचं मयूरसाठी अकल्पित होतं... कारण या मयूरसाठी त्याचा मोबाईल म्हणजे जीव की प्राण होता.. तस पाहायला गेलं तर आज प्रत्येक घरात दिसणारं हे चित्र.. प्रत्येक लहान मुलांच्या हातात आज मोबाईल दिसतोय.. त्याच्या हट्टासाठी १२ वर्षाच्याच काय तर सात- आठ महिन्याच्या लहानग्या जिवाच्या हातातही मोबाईल बिनदिक्कत दिला जातो.. कुणी कसलाही विचार करत नाही.. पण आज मात्र या मयुरवर जी परिस्थीती ओढवलीय ती पाहून तुम्ही नक्की विचार कराल.. घरच्यांनी दिलेला पॉकेटमनी सांभाळून या मयुर राऊतने १२०० रुपयाचा एक चायना मोबाईल घेतला.. पण हाच मोबाईल बॉम्ब बनला आणि मयूरसाठी प्राणघातक ठरला.. आज मयूरने आपल्या छंदापायी घेतलेला हा मोबाईलने त्यांच्या संपुर्ण आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.. त्याचा उजवा डोळा पूर्ण निकामा निकामी झालाय... चेह-याच्या उजव्या बाजूला अनेक जखमा झाल्यात... धातूचे लहान लहान तुकडे खोलवर रुतून बसलेत... इतकंच नाहीतर उजवा अंगठाही त्यानं गमावलाय. आणि हे सारं झाल्यावर भाबडा मयूर निर्वीकारपणे जेव्हा ती घटना सांगतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो..

 

 

पॉकेटमनीच्या १२०० रुपयांतून खरेदी केलेल्या स्वस्त अशा चायना मोबाईलवर गेम खेळणे आणि गाणी ऐकण्याचा छंद मयूरला होता...मात्र हीच हौस मयूरला महागात पडलीय.. हाच चायना मोबाईल एखाद्या बॉम्बप्रमाणे मयूरच्या हातातच फुटला. फक्त नागपूरातचं नाही तर मुंबई पुणे अगदी महाराष्ट्राच्या गावागावात चायना मोबाईलनं थैमान घातलय..मयूर बरोबर झालेल्या दुर्घटनेनंतर केंद्रानं बंदी घातलेल्या या चायना मोबाईलला आता हद्दपार करण्याची वेळ आलीय..