ऑलिम्पिक आणि डर्टी बॉम्ब

लंडनवर हल्ला करून जगभरात दहशत निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे....त्यामुळे लंडनमध्ये संपूर्ण लंडनमध्ये हाय अलर्टवर आहे.. ऑलिम्पिकच्या सुरळीत पार करण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही सज्ज झाल्यात.. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अल कायदा पुन्हा सक्रिय झालीय. आणि अल कायदानं यासाठी आपल्या खास प्रशिक्षित दहशतवाद्यांना विमान उडवण्याचं आणि अपहरण करण्याचंही खास ट्रेनिग दिलय.. अल कायदाचा हा प्लॅन तडीस गेला तर प्रचंड मोठा हाहाकार माजेल.

Updated: Jul 10, 2012, 07:21 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

ऑलिम्पिकचा सोहळा म्हणजे केवळ खेळाडुंसाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी डोळ्याचं पारण फेडणारा आणि प्रत्येक खेळाला सुवर्णमयी करणारा सोहळा असतो.. पण खेळाडुंच्या या महाकुंभमेळ्यावर नजर पडलीय ती दहशतवाद्यांची.. दहशतवाद्यांना ऑलिंम्पिंकवर नाईन इलेव्हनसारखा हल्ला करायचा त्यानी कट आखलाय.. आणि यासाठी त्यानी डर्टी बॉम्बचा प्लॅनही आखलाय.. यावरच  प्राईम वॉचमधून घेतलेला हा वेध, डर्टी बॉम्ब.

 

लंडन ऑलिम्पिक. प्रत्येक खेळा़डूचे स्वप्न असत की, खेळाच्या या महाकुंभामध्ये सहभागी होण्याचे.. यंदा हा महाकुंभ भरणार आहे ब्रिटनमध्ये... लंडन ऑलिम्पिकसाठी ब्रिटनमध्ये लाखो प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे छोटासा स्फोट देखील फार मोठी आपत्ती निर्माण करु शकणार आहे. आणि म्हणूनच दहशतवाद्यानी कुठल्याही डिटोनेटर स्फोटापेक्षा एकाच वेळी वायुच्या माध्यमाने हजारो लोकांच्या प्राणाचा दुष्मन बनणारा डर्टी बॉम्बचा प्रयोग करण्याचं ठरवलय.

ही तीन दृष्य आहेत जी दृष्य दुर्लक्षित केली गेली आणि खरच दहशतवाद्यांचा कट जर वास्तवात उतरला तर हाहाकार माजेल. वास्तवात रेडिओ एक्टीव्ह डर्टी बॉम्ब हा आण्विक बॉम्ब एवढा मोठा नसला तरी या डर्टी बॉम्बची घातकता तेवढीच भयानक आहे. कारण हा डर्टी बॉम्ब प्राणघातक नसला तरी खेळाच्या सर्वात मोठ्या महाकुंभाला क्षणात विस्फोटाचा महाकुंभ बनवू शकतो.. डर्टी बॉम्बमध्ये कोबाल्ट सीक्सटी, अमेरेसियन टू फोरटी वन, प्लुटोनियम टू थ्रटी एट, सिजीयम वन थ्री सेवन या प्रमाणे अनेक विस्फोटक वस्तूचा समावेश केला जावू शकतो. या वस्तूना वापरुन बॅटरी आणि डिटोनेटरशी जो़डलं जातं.. विस्फोटकाचा स्फोट होताच डर्टी बॉम्बमधली विषारी वायू वातावरणात पसरून सर्व परिस्थिती भयावह बनते.. आणि हा धोका तेवढाच गंभीर आहे.. दिल्लीत काही महिन्यापुर्वी झालेल्या स्फोटावरुन याची भिषणता समजून येईल.

 

दिल्लीत मायापुरीत कोबाल्ट सिक्सटीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी विषारी वायूनं संपुर्ण वातावरणात आपलं साम्राज्य निर्माण केल होतं.. पण त्यावेळी कोबाल्ट सिक्सटीच्या संपर्कात आलेल्या मजूर गंभीर अशा त्वचारोगांला सामोरं जावं लागलं होते, काहीना श्वसनाचा त्रासही झाला होता. अनेकांचे हात पोळले होते.. यातील गंभीर जखमी असणा-या आठपैकी एकाचा मृत्यु झाला होता. कोबाल्ट सिक्सटीमुळे डर्टी बॉम्बची दहशत वाढलीय.. दिल्लीचा कोबाल्ट सिक्सटी फक्त एक दुर्घटना होती असं म्हटल जात.. पण अशा पद्धतीचा डर्टी बॉम्बचा वापर झाला तरी अनर्थ होईल.. डर्टी बॉम्बचा वापर करुन दहशत माजायची हा कट यापुर्वीही आखण्यात आला होता.. सुरक्षा यंत्रणांना २०११ मध्ये अल कायदाच्या ताब्यातल्या या प्लॅनविषयी कुणकुण लागली होती. विकीलिक्सच्या म्हणण्य़ानुसार अल कायदाला रेडिओ एक्टीव्ह युरेनियम आणि प्लुटोनियम हवं होतं त्यासाठी अल कायदानं अनेक प्रयत्नही केल होतं.. त्यावेळी झालेल्या खुलाशात ही शंका अमेरिकेनं यासंदर्भात ब्रिटनकडे माहिती दिली होती असल्याचही उघड झालयं.. कझाकीस्तान, लिस्बेन आणि आफ्रिकामधून रेडिओ एक्टीव्ह युरेनियम मिळवण्यात अल कायदाला अपयश आलं होतं.. आणि हेच नेमक अल कायदाचं दुखण आहे आणि म्हणूनच अल कायदानं आता ऑलिम्पिकमध्ये दहशत माजवण्याचा प्लॅन आखला आहे.

 

अमे्रिकेवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यातील मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनच्या मृत्युनंतर अल कायदाला पुन्हा एकदा आपलं स्थान पक्क करायचयं.. म्हणून त्यानी आता ऑलिम्पिकला टार्गेट करायचं ठरवलय़.. कारण त्याना ऑलिम्पिकचा खेळ उधळवून स्वताचा डाव खरा करायचाय.. आणि यासाठी खेळाचा हिरमोड करण्यासाठी रचला गेलाय मास्टरगेम.

 

प्रचंड सुरक्षायंत्रणेच्या देखरेखीखाली होत असलेल्या लंडन ऑलिम्पिकवर दहशतीचे सावट कायमच आहे.. लंडन ऑलिम्पिकच्या ठिकाणापासुन काही अंतरावर असणा-या सहा संशयिताला अटक झाल्यामुळे संपुर्ण ब्रिटनवरच आता या निमित्तानं दहशतीचे सावट पसरलयं हे नक्की झालय.. ऑलिम्पिकला अ