रहा चिरतरुण!

आजचा ‘झी २४ तास’चा स्पेशल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असलेली ब्यूटी क्रीम खरेदी करणं बंद कराल. आता ती वेळ लवकरच येणार असून, तुम्ही वृद्धत्व रोखण्यासाठी घेत असलेली औषधं खरेदी करणं बंद कराल. आपण आयुष्यभर तरुण दिसावं असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय संशोधकांनी शोधून काढलंय असं औषध, जे तुम्हाला वयाच्या सत्तरीतही तरुण ठेवणार आहे.

Updated: Aug 1, 2012, 10:41 AM IST

www.24taas.com, मुंबई

आजचा ‘झी २४ तास’चा स्पेशल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्ही चेहऱ्यासाठी वापरत असलेली ब्यूटी क्रीम खरेदी करणं बंद कराल. आता ती वेळ लवकरच येणार असून, तुम्ही वृद्धत्व रोखण्यासाठी घेत असलेली औषधं खरेदी करणं बंद कराल. आपण आयुष्यभर तरुण दिसावं असं तुमचं जर स्वप्न असेल तर तुमची ती इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय संशोधकांनी शोधून काढलंय असं औषध, जे तुम्हाला वयाच्या सत्तरीतही तरुण ठेवणार आहे.

भारतीय संशोधकांनी ते ‘एन्झाईम’ शोधून काढलंय जे माणसाला चिरतरुण ठेवू शकतं. हिमाचलच्या पालमपूरमधील  हिमालय जैव संपदा प्रौद्योगिक संस्थेत कार्यरत असलेले डॉक्टर संजय कुमार यांच्या टीमने हे अनोखं संशोधन केलंय.  हिमालयात आढळून येणाऱ्या वनऔषधीतून ते एन्झाईम वेगळं करण्याची कामगिरी त्यांनी केलीय.

 

इंद्राच्या आप्सरेचं सौंदर्यही तिच्या समोर खुजं भासावं असं मर्लिनला सौंदर्य लाभलं होतं. पन्नासच्या दशकातील या सौंदर्यवतीच्या सुंदरतेची जादू आजच्या तरुण पिढीवरही  कायम आहे. जर चिरतरुण राहण्याचं औषध मिळालं असतं तर तरुण्यातील मर्लिन मुनरोला पाहण्याची आजच्या पिढीची इच्छा पूर्ण झाली असती... मधुबालाचं सौंदर्यही तसंच होतं... मधुबालाच्या सौंदर्याने तर भारतीयांना अक्षरश: वेड लावलं होतं... बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना आजही मधुबालाशी आपली तुलना केली जावी असं मनोमन वाटतं असतं. मधुबालाला पाहण्याची इच्छा आजही अनेकांच्या मनात आहे. त्यामागचं कारण म्हणजे मधुबालंचं निखळ सौंदर्य... मधुबालाच्या सौंदर्याची जादूच काही और होती... अभिनेता असो की अभिनेत्री तरुणपणातील आपला  आवडता कलाकार पहाण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांना  असते... त्यांची ती इच्छा पूर्णही झाली असती जर चिरतरुण राहण्याचं औषधी सापडलं असतं तर... खरं तर वृद्धत्वापासून कुणाचीच सुटका झाली नाही... गरीब असो की श्रीमंत वृद्धत्वावर कुणालाच मात करता आली नाही. पण येत्या काही वर्षात मणुष्याला वृद्धवावर मात करता येणार आहे. कारण आता सापडलीय तारुण्य टिकवून ठेवणारी वनऔषधी. चिरतरूण ठेवणारी वनऔषधी  म्हातारपणाला जवळ भटकू देणार नाही आणि तारुण्याला दूर जाऊ देणार नाही. विशेष म्हणजे ती वनऔषधी भारतीय संशोधकांनी शोधून काढलीय. हिमाचल प्रदेशातील पालमपूरमध्ये असलेल्या हिमालय जैवसंपदा प्रौद्यागिक संस्थेने ते ‘एन्झाईम’ शोधून काढलयं. या एन्झाईममुळे मनुष्याला वृद्धत्वार मात करता येणार आहे.

 

रामभक्त हनुमानने लक्ष्मणासाठी जेथून संजीवनी वनऔषधी  आणली होती त्याच भूमित  ‘सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज’ नावाचं एन्झाईम  वेगळं करण्यात संशोधकांना यश आलंय. माणसाला चिरतरुण ठेवणारी औषधी हिमालयातील बर्फाच्छादीत लाहौल स्पितीमधल्या कुंजमवासमध्ये  पोटोंटटिल्ला या वनस्पतीत आढळून आली आहे. पोटोंटटिल्ला ही वनस्पतीत जंगलात आढळून येते. संशोधकांनी त्या वनस्पतीत ‘ऑक्साईड डिस्म्यूटेज’ नावाचं एन्झाईम शोधून काढलं आहे. त्या एन्झाईममुळे वृद्धत्व रोखलं जातं. IHBT ने केलेलं हे संशोधन प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सायन्स जर्नल नेचरमध्ये प्रसिद्ध झालं आहे. तसेच आता त्या एन्झाईमचा लहान प्राण्यांवर प्रयोग केला जात आहे. त्यानंतर लवकरच ते  औषध  वापरात येणार आहे.

 

 

सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेज या औषधाकडे लोकांच  लक्ष लागलंय. खरंच हे औषध साठ  वर्षाच्या वयोवृद्धाला ४० वर्षाचा तरुण बनवणार आहे का? हा प्रश्न आज विचारला जातोय आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय त्या  इंजाईमच्या शक्तीमध्ये. एखाद्या ब्यूटी क्रिमच्या रुपाने ते तुमच्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कसं बनल ब्रम्हांड... कशी  झाली पृथ्वीची उत्पत्ती... कसा जन्माला आला माणूस आणि का होतो माणसाचा मृत्यू ... या आणि अशा अनेक प्रश्नाच्या शोधात सर्वसामान्य माणूस नेहमीच भटकत असतो. अशाच काही अनुत्तरीत प्रश्नापैकी एक प्रश्न म्हणजे, कस येतं वार्धक्य... खरंतर म्हातारपण कोणालाच नको असतं आणि म्हणूनच शोध सुरु आहे तारुण्यपणाची अवस्था कायम राखणाऱ्या औषधाचा... माणसाला  चिरतरुण बनवणाऱ्या सुपर ऑक्साईड डिस्म्यूटेजच्या इंजाईममधून या साऱ्या गोष्टीला बळकटी मिळालीय.