www.24taas.com, मुंबई
क्रूरकर्मा अजमल आमिर कसाबच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयानेही मोहर उमटवली आहे. साऱ्या देशाचं लक्ष लागल होतं या निर्णयाकडे. कसाबने केलेला हल्ला हा देशावरील हल्ला होता... कसाबचे कृत्य सहन करण्यासारखे नाही… म्हणून कसाबला फाशीची शिक्षाच देण्यात यावी’ अशा शब्दात पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावला.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करून मुंबईला तब्बल साठ तास वेठीस धरणाऱ्या कसाबची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलीय. २१ फेब्रुवारी २०११ला मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानिर्णयाविरोधात कसाबने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. फाशीऐवजी जन्मठेपेची देण्यात यावी, अशी मागणी त्याच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावीत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केला असला तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. ती याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यास तो सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिका दाखल करण्याचा पर्याय त्याच्याकडं आहे. या दोन्ही याचिका फेटाळल्यास त्याला राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. मुंबई हल्ल्य़ाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली असली तरी या प्रकरणातील आरोपी फहिम अन्सारी आणि सबाऊद्दीन शेख या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. तसंच सर्वोच्च न्यायालयाने कसाबचा फैसला सुनावला असला तरी त्याला प्रत्यक्षात फासावर चढविण्यासाठी किती काळ लागेल हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
इतिहास कसाबच्या खटल्याचा...
२६ नोव्हेंबर २००८ रोजी म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी कसाब आणि त्याच्या साथिदारांनी मुंबईवर हल्ला केला होता. खरं तर त्यांनी भारताविरुद्ध युद्धच पुकारलं होतं. कसाबवर कसा चलला खटला आणि किती काळ लागला या प्रक्रियासाठी यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाब... २६ नोव्हेंबर २००८ला कसाबने आपल्या साथिदारांच्या मदतीने मायानगरी मुंबईवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यातील कसाब हा एकमेव जिवंत आरोप पोलिसांच्या हाती लागला होता. ३० नोव्हेंबरला पोलिसांसमोर कसाबने तोंड उघडलं आणि या हल्ल्यामागचा नापाक इरादा उघड झाला. आपण पाकिस्तानचा रहिवासी असल्याची कबुली कसाबने दिली. मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी कसाब आणि त्याच्या साथिदारांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं होतं तसेच ते एकूण १० जण समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते. कसाबच्या जबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. मुंबई हल्ल्याची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी सरकारने विशेष न्यायालयाची स्थापना केली आणि १३ जानेवारी २००९मध्ये एम.एल.तहिलयानी यांची विशेष कोर्टाचे न्यायाधिश म्हणून नियुक्ती करण्यात आली. २० फेब्रुवारी २००९ला महानागरदंडाधिकाऱ्यांसमोर कसाबने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पाकिस्तानात घेतलेल्या लष्करी प्रशिक्षणापासून ते मुंबईवर केलेल्या हल्ल्यापर्यंतची इत्यंभूत माहिती त्याने कबुली जबाबात दिली होती. या हल्ल्याप्रकरणी कसाब प्रमाणेच फहिम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांवरही आरोप ठेवण्यात आले होते. २५ फेब्रुवारी २००९ ला सरकारी पक्षाने कसाबसह तिघांविरोधात १५ हजार पानांचं आरोपपत्र न्यायालया समोर सादर केलं आणि त्याच दिवशी अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १५ एप्रिलला या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. पण त्याचवेळी तांत्रिक कारणामुळे अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबचं वकीलपत्र काढून घेण्यात आलं होतं आणि अब्बास काझमी यांना कसाबचा वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने लावलेले सर्व आरोप कसाबने फेटाळून लावले. ८ मे २००९ ला पहिल्या साक्षिदाराने न्यायाधिशांसमोर साक्ष नोंदवली. २० जुलै २००९ ला न्यायालयाचं कामकाज सुरु असतानाच कसाबने कसाबने कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला. याचदरम्यान मुंबई पोलिसांनी पाकिस्तानातील हफीज सईद आणि जाकीर रहमान लखवीसह २२जणांविरोधात अजामीन वॉरंट जारी केलं. या संपूर्ण खटल्यात ६५३ साक्षिदार कोर्टाने तपासले. तब्बल २७१ दिवस हा खटला चालविला ग