www.24taas.com, कोल्हापूर
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ अखेर विकला गेलाय. मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचा असलेला हा स्टुडिओ 11 कोटी रुपयांना विकला गेलाय. कोल्हापूरसाठी मानबिंदू असलेल्या या स्टुडिओची विक्री झाल्याने कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत.
छत्रपती राजाराम महाराजांनी 1934 साली हा स्टुडिओ उभारला होता. त्यानंतर 1944 साली चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी हा स्टुडिओ खरेदी केला.. पुढं या स्टुडिओची मालकी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडं आली... या स्टुडिओमध्ये भालजींच्या काळात नेक भव्य चित्रपटांची निर्मिती झाली. या स्टुडिओनं अनेक नामवंत कलाकार, तत्रंज्ञ मराठी सिनेसृष्टीला दिले. अनेक कालकार, ततंज्ञांचा या स्टुडिओशी वैयक्तिक जिव्हाळा होता, इतकचं नाही तर कोल्हापूरकरांसाठी हा अस्मितेचा विषय होता. त्यामुळं हा स्टुडिओ विकण्यास अनेकांचा विरोध होता.
मंगेशकर कुटुंबीयांचे देशप्रेम आणि कलेच्या क्षेत्रातील योगदान वादातीत हे, तसचं हा त्यांच्या खाजगी मालकीचा स्टुडिओ असल्यानं त्याची विक्री करण्याचा पूर्ण अधिकारही त्यांना आहे, मात्र या स्टुडिओशी कोल्हापूरकरांच्या असलेल्या नात्यामुळं, स्टुडिओची विक्री झाल्यानं अनेकांनी खंत बोलून दाखवली.