www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं...गेले सहा दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचतील.. पण सा-या आशा, अपेक्षा प्रार्थना निष्फळ ठरल्या.
सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेवटी सरबजीत सिंह यांनी मृत्यूसमोर हार पत्करली. त्यावेळी पाकिस्तानात रात्रीचे एक वाजले होते...जिन्ना रुग्णालयातील डॉक्टरांनी सरबजीत सिंग यांना मृत घोषीत केलं..सरबजीत सिंग यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
सरबजीतचा झाला मृत्यू
पाकिस्तानच्या रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास
६ दिवस दिली मृत्यूशी झुंज
कोणी केला सरबजीतचा खून ?
कोणी रचलं खुनाचं षडयंत्र ?
का केला सरबजीतचा खून ?
२६ एप्रिलला पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगात सरबजीत सिंग यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यानंतर त्यांना जिन्ना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं..मात्र रुग्णालयात त्यांची प्रकृती आणखीच खालावत गेली...सरबजीत सिंग यांची शुध्द हरपली आणि त्यानंतर त्यांना शुध्द आलीच नाही..
सरबजीत सिंग यांच्या प्रकरणात पाकिस्तानने सुरुवातीपासूनच आ़डमुठी भूमिका स्विकारली..मानवीदृष्टीकोणातून सरबजीतसिंग यांना उपचारासाठी भारतात पाठविण्याची विनंती भारताने केली होती...तसेच सरबजीत सिंग यांच्या कुटुंबानेही तशी विनंती केली होती..मात्र पाकिस्तानने त्याकडं साफ दुर्लक्ष केलं त्यामुळेच बुधवारी सरबजीत सिंगचे कुटुंबिय निराश होवून भारतात परतले होते...मात्र त्यानंतर सरबजीत सिंगच्या मृत्यूची खबर येवून धडकली.
पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगातून सरबजीतने आपल्या कुटुंबाला काही पत्र लिहिली होती..त्या पत्रात त्याने तुरुंगात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली होती...आणि ज्याची भिती त्याने व्यक्त केली होती दुर्देवाने तेच घडलं. गेल्या २३ वर्षांपासून सरबजीत सिंग पाकिस्तानातील तुरुंगात कैद होते..त्यांचा आक्रोश तुरुंगाच्या चार भिंतीपलिकडे पोहचत नव्हता. कुटुंबा व्यतिरिक्त त्यांच्या वेदनेची दखल घेण्याची तसदी कुणी घेतली नाही.
सरबजीतची बहिण दलबीर कौर यांनी सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडली.. सरबजीतच्या दोन मुलींना घेऊन तिने थेट दिल्ली गाठली..दिल्लीतील प्रत्येक महत्वाच्या राजकीय व्यक्तींचा उंबरठा तिने झिजवला..सरबजीतला न्याय मिळावा यासाठी तिने राष्टपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांना साकडं घातलं..तसेच युपीएच्या अध्यक्षा सोनीया गांधीनांही विनंती केली होती.
त्यानंतर ख-याआर्थाने अवघ्या देशाला सरबजीत सिंग यांची ओळख झाली..सरकारमधील लोकांनी सरबजीत सिंगच्या सुटकेसाठी आवाज उठवला खरा मात्र त्यांच्या सुटकेसाठी केल्या जाणा-या प्रयत्नांचं वास्तव काही वेगळचं होतं...भारत सरकारकडून सरबजीतच्या कुटुंबियांना केवळ आश्वासन दिलं जातं होतं आणि तिकडं पाकिस्तानच्या तुरुंगात सरबजीत सिंग यांना यातना सहन कराव्या लागत होत्या...तीन वर्षांपूर्वी सरबजीत सिंग यांनी आपल्या कुटुंबाला एक पत्र लिहिलं होतं...त्या पत्रात त्यांनी आपली वेदना मांडली होती.
सुटकेच्या आशेवर दिवस घालवणं किती कठीण असतं, हे माझ्यापेक्षा दुसरं कोण बंर सांगू शकेल ? पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी मी मंजित असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सगळ्या जगाला माहित आहे.तुरुंगातील कर्मचारीही त्यात सहभागी आहेत.मी बॉम्बस्फोट केले असल्याचं काही कैदी देखील सांगतात.
दिवस महिन्यात रुपांतरीत झाले आणि महिने वर्षात...आणि एक दिवस ती बातमी येवून थडकली.
सरबजीतची सुटका करण्यात येणार असल्याचं ते वृत्त होत...पाकिस्तानचे राष्ट्रपती जरदारी यांनी सरबजीत सिंगची शिक्षा माफ केली होती..ते वृत्त ऐकताच सरबजीत सिंगच्या गावात आनंदाचं वातावरण पसरलं ..पण त्यांचा तो आनंद काही तासच टिकला...कारण दगाबाज पाकिस्तानने घुमजाव करत सरबजीत ऐवजी सुरजीतची मुक्तता करण्यात आल्याचं सांगितलं..वास्तवात पाकिस्तान सरकारकडून नावात कोणतीच चूक झाली नव्हती..तर हे सगळं सरबजीत सिंग विरोधात एक षडयंत्र होतं.
सरबजीतची मुक्तता केल्यास सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी सरकारला भिती वाटत होती...आणि त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपला निर्णय फिरवला..पण त्यानंतरही सरबजीतची मुक्तता होईल अशी त्याच्या कु