<B> <font color=Red>झी एक्सक्लुझिव्ह :</font></b> आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवीन टर्मिनल

मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलची इमारत आता पूर्णत्वाला आलीय. तब्बल सदुसष्ट टक्के काम पूर्ण झालं असून येत्या वर्षभरात सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 3, 2013, 10:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलची इमारत आता पूर्णत्वाला आलीय. तब्बल सदुसष्ट टक्के काम पूर्ण झालं असून येत्या वर्षभरात सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
या टर्मिनलमध्ये १८८ चेक इन काउंटर असून ६० इमिग्रेशन काउंटर जाणाऱ्या प्रवाशांसाठी तर ७६ येणाऱ्या प्रवाशांसाठी उभारण्यात आलेत. दरवर्षी ४० लाख प्रवासी वापर करण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे. या प्रवाशांना तात्काळ ४७ एस्कलेटर आणि ७३ एलिव्हेटर निर्माण करण्यात येणार आहेत. चार मजली असलेल्या या टर्मिनलचा खर्च आता ९८०० कोटीत पोहोचलाय.
विशेष म्हणजे डोमेस्टिक सहार एअरपोर्टवर जाण्यासाठी सहा रस्ते असलेला ‘एलिव्हेटेड एक्स्प्रेसवे’ सुरु करण्यात येणार आहे. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ५००० वाहने पार्क करता येईल असं ‘मल्टीलेव्हल पार्किंग’ करण्यात येणार आहे. १८४ प्रकारच्या सेवा देण्यासाठी साठ हजार जणांना प्रशिक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.. या टर्मिनलमधून बहुतांशी आंतरराष्ट्रीय हवाई सेवा दिली जाणार असून मध्यरात्री अविरत असणार आहे. सध्या एक ते साडेचारपर्यंत विमानतळ बंद असतं. मात्र, यापुढे ही सेवा चोवीस तास दिली जाणार असल्याने तीन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी लोकांचा ताफा तयार केला जातोय.

व्हिडिओ पाहा : या विमानतळाचे एक्सक्लुझिव्ह विज्युअल्स झी २४ तासकडे उपलब्ध झालेत…

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.