अग्निपंख

गुरुवारी अग्नी - 5 या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी झाली आणि अर्धं जग भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं. अग्नी -5 चा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अवघ्या 20 मिनिटात पाच हजार किलोमिटर अंतर पार करण्याची क्षमता अग्नी -5मध्ये आहे.

Updated: Apr 21, 2012, 10:01 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

गुरुवारी अग्नी - 5 या क्षेपणास्त्राची गुरुवारी चाचणी यशस्वी  झाली आणि अर्धं जग भारताच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आलं. अग्नी -5 चा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.  अवघ्या 20 मिनिटात पाच हजार किलोमिटर अंतर पार करण्याची क्षमता अग्नी -5मध्ये आहे.

 

युद्धाच्या मैदानात सर्वात महत्वपूर्ण आणि सर्वात घातक  शस्त्र म्हणजे क्षेपणास्त्र. त्या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीलाही मागे टाकणारा असून 5 हजार किलोमीटर पर्यंत शत्रूवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. शत्रूला जराही हालचाल करायला संधी देत नाही हे क्षेपणास्त्र...अर्ध्या जगात कुठेही लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र  जगातल्या काही निवडक देशांकडंच आहेत.पण आता भारतही त्या निवडक पाच देशांत सहभागी झालाय..पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आता भारतानेही प्राप्त केली आहे. अग्नी पाच या क्षेपणास्त्रामुळेच भारताला हे बळ मिळालंय. अग्नी - पाच हे भारताचं महाशक्तीशाली क्षेपणास्त्र आहे.

 

आता जर कोणी भारताकडं वाकड्या नजरेनं पाहण्याचं धाडस केलं तर तो देश जगात कुठेही असला तरी अग्नी पाच हे क्षेपणास्त्र त्याला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. होय भारताचं अग्नी क्षेपणास्त्र आपल्या शत्रूला जराही हालचाल करण्याची संधी देत नाही.कारण एकदा लक्ष्य निश्चित केल्यानंतर आणि एक बटन दाबल्यावर हे क्षेपणास्त्र अवघ्या काही मिनिटांत पाच हजार किलोमीटरचं अंतर पार करुन  लक्ष्य भेदतं...पाच हजार किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी या क्षेपणास्त्राला केवळ 20 मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे..होय अवघ्या 20 मिनीटात अग्नी पाच क्षेपणास्त्र शत्रूला बेचिराख करु शकतं..या क्षेपणास्त्रामुळं भारत बनलाय सुपर पॉवर.

 

अग्नीचं परिक्षण यशस्वी झाल्यामुळं भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे...पण त्यासाठी वैज्ञानिकांनी 14 वर्ष कठोर मेहनत केली आहे..आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. अग्नी पाचच्या यशस्वी परीक्षणाबरोबरच भारताने क्षेपणास्त्राचं असं काही चक्रव्यूह तयार केलंय की ते भेदणं सहजासहजी कोणाला शक्य होणार नाही. कारण आता भारताकडं आहे  अग्नी पाच हे पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र . 14 वर्षाच्या कालावधीत जगातील सर्वात वेगवान अग्नी पाच हे क्षेपणास्त्र तयार करुन भारताने इतिहास घडवलाय. या बहुमोल कामगिरीबद्दल  पंतप्रधांनांनी  वैज्ञानिकांचं अभिनंदन केलंय.

 

ओडिशाच्या व्हीलर बेटावरुन अग्नी पाच झेपावल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात त्याने पाच हजार किलोमिटरचं अंतर पार करुन आपल्या निर्धारीत लक्ष्याचा वेध घेतला. अग्नीने जे लक्ष्य़ भेदलं आहे ते ऑस्ट्रेलिया पलिकडं आहे..डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार अग्नीने तेव्हडंच अंतर दुस-या दिशेला पार केलं असतं तर भविष्यातील सर्वात मोठ्या अव्हानं संपूष्टात आलं असतं.

अग्नी पाचच्या यशस्वी परिक्षणासोबतच या वर्षी आणखी एक परिक्षण घेण्यात येणार असल्याचं डीआरडीओने जाहिर केलं आहे..तसेच  अग्नीला मोबाईल लाँचरवरुन सोडण्यात येणार आहे..या परिक्षणानंतर अग्नी पाच हे भारतीय सैन्य़ात दाखल होणार आहे. अग्नी पाचमुळे भारतीय सैन्याला दहा हात्तीचं बळ लाभणार आहे.अग्नी पाच हे क्षेपणास्त्र केवळ युद्धनितीसाठीच नाही तर कुटनितीसाठीही त्याचा वापर होणार आहे.. भारतावर हल्ला करण्यापूर्वी शत्रूला अनेक वेळा विचार करावा लागणार आहे. कारण भारतावर हल्ला केल्यास अग्नी पाचचा सामना करावा लागणार याची जाणीव त्या राष्ट्राला ठेवाणी लागणार आहे. तसेच अग्नीपाच पासून वाचणं त्यांना शक्य होणार नाही..

 

पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा वेध घेणारं अग्नी-5 हे क्षेपणास्त्र भारताने तयार केलंय. अशा प्रकारचं क्षेपणास्त्र भारताच्या सैन्यात असावं यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न केला जात होता..कारण  पाकिस्तानच्या कोणत्याही भूभागावर हल्ला करण्याची क्षमता भारताने यापूर्वीच प्राप्त केली आहे..मात्र चीनच्या बाबतीत मर्यादा येत होत्या...अग्नी - पाचमुळे त्या सगळ्या मर्यादा आता गळून