www.24taas.com, मुंबई
घरगुती गॅसच्या प्रस्तावीत दरवाढी विरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहेत...सत्तेत असतांनाही काँग्रेसने विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय.. ही दरवाढ मागे घ्यावी यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं साकडं घातलं आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अर्थ संकल्प सादर करतांना घरगुती गॅसच्या दरात 5 टक्के दरवाढ प्रस्तावीत केली...मात्र त्यानंतर विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने त्या दरवाढीचा विरोध केला..अर्थमंत्र्यांनी प्रस्तावीत केलेली घरगुती गॅसची दरवाढ अन्यायकार असल्याचं काँग्रेसने म्हटलं...घरगुती गॅस दरवाढीच्या निमित्ताने काँग्रेसने अजित पवारांना कोंडीत पक़डण्याचा प्रयत्न केला....काँग्रेसच्या या खेळीमागे जिल्हापरिषद निवडणुकांचं कारण असल्यांचही बोललं जातंय.. जिल्हारिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला धोबीपछाड दिल्यामुळे आघाडीत कटूता आलीय..अशातच घरगुती गॅसवर पाच टक्के कर अकारणीचा प्रस्ताव अजित पवारांनी मांडल्यामुळं काँग्रेसच्या हाती आयताच मुद्दा मिळाला आहे..या मुद्द्यावरुन दोन्ही काँग्रेसमध्ये संघर्ष पेटला आहे.
अजित पवारांनी घरगुती गॅस दरवाढीचं समर्थन केलं आहे...या अर्थसंकल्पाला मंत्रीमंडळाची मान्यता असल्याचं सांगत हा निर्णय मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या मंत्र्यांना मान्य असल्याचं सांगितलंय....मात्र काँग्रेसने अजित पवारांनाच निशाण्यावर घेतलंय... अजित पवारांनी प्रस्तावीत केलेल्या गॅस दरवाढीला विरोध करुन आपण जनतेसोबत असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय...काँग्रेसने या खेळीत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत...घरगुती गॅस दर वाढीला विरोध करुन जनतेची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केलाय तसेच अजित पवारांनाही कोंडीत पकडलं आहे..
गॅसच्या मुद्यावरुन काँग्रेसने अजितदादांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी नुकतेच पार पडलेल्या झेडपीच्या निवडणुकींची त्याला किनार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे...कारण त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला चकवा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अशा प्रकारे कलगीतुरा रंगला होता..दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवला..राज्यातील 26 पैकी 13 जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला अध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवलं...त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची मदत घेतली...भाजप, शिवसेना आणि मनसे यांच्या साथिनं राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत अव्वल नंबर पटकावला...राष्ट्रवादी काँग्रेसची ही राजकीय खेळी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली.
खरं तर जिल्हापरिषदेच्या निवडणुका पार पडल्यानतर दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय केला होता..दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असती तर काँग्रेसचे 13तर राष्ट्रवादीचे 9 ठिकाणी अध्यक्ष निवडून आले असते..मात्र कुरघोडीच्या राजकारणात आघाडी होवू शकली नाही..त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसला...विशेषत: विदर्भात काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला घास राष्ट्रवादीने पळवलाय.. विदर्भात काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं...पण राष्ट्रवादीच्या खेळीमुळे सातपैकी केवळ दोन जिल्हापरिषदांमध्ये काँग्रेसला अध्यक्षपद आणि एका ठिकाणी उपाध्यक्ष पद मिळवता आलंय़...काँग