www.24taas.com, मुंबई
राज ठाकरेंनी गुरुवारी मालेगावात मोठ्या आवेशात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळं मुंबईत आयोजित बिहार दिनाच्या कार्यक्रमाचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण राज यांनी दिलेल्या आव्हानाला चोवीस सातही उलटले नाही त्यापूर्वीच त्यांनी आपला विरोध मागे घेतला..कसं झालं हे मतपरिवर्तन ?
मुंबईत होऊ घातलेल्या बिहार दिनाला गुरुवारी कडाडून विरोध करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवघ्या 24 तासात आपली भूमीका बदललीय. राज यांचा विरोध अचानकपणे मावळल्यामुळं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय...गुरुवारी मालेगावात राज ठाकरेंनी एका जाहिर सभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना मुंबईत बिहार दिन साजरा करुनच दाखवाच असं थेट आव्हानचं दिलं होतं. त्यामुळं राज्य़ातील वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं.
राज ठाकरे विरुद्ध नितिशकुमार असा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली होती. मात्र कार्यक्रमाच्या आयोजकांनी शुक्रवारी कृष्णकुंजवर जाऊन मनसेप्रमुखांची भेट घेतली आणि त्यानंतर बिहार दिनाला असलेला मनसेचा विरोध मावळला. बिहार राज्याच्या निर्मितीला शंभर वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने 15 एप्रिलला मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार उपस्थित राहणार आहे. मात्र हा कार्यक्रम होण्यापूर्वीच वादात सापडला होता. कारण नितीशकुमार आणि राज ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. पण 24 तासाच्या आत या दोन नेत्यांमधील वाद शमला. खरं तर तसे संकेत शुक्रवारी नितिशकुमारांच्या वक्तव्यातून मिळाले होते. मुंबईत बिहार दिन साजरा करुन दाखवाच असं राज यांनी आव्हान दिल्यानंतरही नितिशकुमारांनी एक पाऊल मागे घेत मवाळ भूमीका घेतली होती.
नितीशकुमारांनी आपली भूमिका सौम्य़ केल्यानंतर राज ठाकरेंनीही एक पाऊल मागे घेत रविवारी होऊ घातलेल्या बिहार दिनाच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवला.
बिहार दिनाचा कार्यक्रम हा अराजकीय असल्याचं आयोजकांनी सांगितल्यानंतर राज यांनी कार्यक्रमाला असलेला विरोध मागे घेतला.गैर समजातून हा वाद रंगल्याचं आयोजकांकडून स्पष्टीकरण देण्य़ात आलंय. मात्र हा वाद इतक्या लवकर पण्यामागे काही वेगळी राजकीय कारणं तर नाही ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
बिहार दिनाच्या मुंबईतील कार्यक्रमाला मी उपस्थितीत राहणारच. देशातील कुठल्याही भागात मी जाऊ शकतो त्यासाठी मला व्हिसाची गरज नाही, मुंबईत जायला मला कुणाच्या व्हिसाची गरज नाही असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केल खरं, पण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच खळबळ उडाली होती. प्रत्येक पक्षाने आपआपल्या राजकीय सोईप्रमाणे भूमिका घेतली. तसेच एकमेकांचं उट्टे काढण्याची संधीही या निमित्ताने साधलीय.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या याच वक्तव्यामुळंच महाराष्ट्रात नवं राजकीय वादळ घोंगावू लागलं होतं.....पुन्हा मराठी विरुद्ध परप्रांतिय असा संघर्ष पेटणार तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात होती...मराठीचा मुद्दा घेऊन जन्माला आलेली शिवसेना नितीशकुमारांच्या त्या वक्तव्यावर कोणती भूमिका घेतेय याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...पण भाजपशी असलेल्या युतीच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे शिवसेनेनं याप्रकरणी मवाळ भूमिका घेतली...मात्र भाजपलाही टार्गेट करण्याची संधी शिवसेना नेत्यांनी सोडली नाही..
बिहारमध्ये भाजपची नितीशकुमारांशी युती असल्यामुळे नितीशकुमारांना थेट टर्गेट करण्याची राजकीय खेळी शिवसेनेला खेळता आली नाही..पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट नितीशकुमारांनाच आव्हान दिल्यामुळं राजकारण तापणार अशी शक्यता वर्तवली जात होती..
नितीशकुमारांच्या वक्तव्यावर दोन्ही ठाकरे बंधूनी वेगवेगळी भूमिका घेतली असली तर