रेल्वे अपघातांना आळा बसणार का?

जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.

Updated: Mar 13, 2012, 03:50 PM IST

www.24taas.com, मुंबई

जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षात तब्बल ३९,००० पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यामध्ये २००७ व्या वर्षात सर्वात जास्त ३९९७ प्रवासी मृत्युमुखी पडले. तर ४३०७ जखमी झाले. तर २००९ मध्ये ३७८२ ठार तर ४०३० जखमी, २००९ मध्ये ३७०६ ठार, ४०३७ जखमी, २०१० मध्ये ३७१० ठार, ४१२३ जखमी आणि २०११ मध्ये ३४५८ ठार, ४१६२ जखमी झाले आहेत. म्हणजेच दर वर्षी सरासरी ३४०० प्रवासी लोकल प्रवास करतांना मृत्युमुखी पडत आहेत,  तर ४००० प्रवासी जखमी होतांना दिसत आहे.

विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने फटकारुनसुद्धा पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अपघातांच्या बाबातीत ठोस पावले उचलत नाही. लोकलची संख्या पुरेशी वाढवण्यास रेल्वे अपयशी ठरल्याने गर्दी वाढत आहे आणि अपघात होत आहेत. किमान जखमी झालेल्या प्रवाशांवर ताबडतोब प्रथमोपचार कऱण्याची जवाबदारी जरी रेल्वेने स्वीकारली तरी अनेकांचे प्राण वाचू शकतात.