www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाणच्या क्रिकेट करिअरचा द एन्ड झाला आहे. आय़पीएलच्या सहाव्या सीझनमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे आता या दोघांना आयुष्यभर क्रिकेट खेळता येणार नाही. स्पॉट फिक्सिंगसराखा अक्षम्य गुन्हा केल्यानं अंकित आणि श्रीशांतचा गेम ओव्हर झाला असचं म्हणाव लागणार आहे.
राजस्थान रॉयल्सचे खेळाडून श्रीशांत आणि अंकीत चव्हाण आयपीएल- ६ च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अजित चंडिलावरही स्पॉट फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. हे प्रकरण उजेडात आल्यावर तिघांना अटक करण्यात आले. सध्या हे तिघेही जामीनावर सुटले आहेत.
बीसीसीआयने शुक्रवारी शिस्त पालन समितीने कठोर निर्णय घेत, श्रीशांत आणि अंकीत चव्हाण यांच्यावर आजीवन बंदी घातली आहे. तर अमित सिंगवर ५ वर्ष तर सिद्धार्थ त्रिवेदीवर एक वर्षांची बंदी घातली आहे. या प्रकरणात अजित चंडिलाचं म्हणणं ऐकणे बाकी असल्याने त्याच्या संदर्भात निर्णय अद्याप दिला नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.