www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएलमधील टीम कोलकाता नाईट रायडरचा मालक आणि बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुखनं पहिल्यांदाच सट्टेबाजीवर आपलं तोंड उघडलंय. किंग खाननं एका मुलाखतीदरम्यान स्पॉट फिक्सिंगबद्दल आपली मतं व्यक्त केलीत.
‘एका खेळप्रेमीच्या रुपात आणि तेही तुम्ही त्या खेळात सहभागी आहात तेव्हा आपणंच तिकीटं ब्लॅक करणं चुकीचंच आहे. मी स्वत: तिकीटं ब्लॅकनं विकणार नाही. जर दुसऱ्या कुणाला करायचंय तर त्यानं करावं. एक टीम मालक म्हणून मला असं वाटतंय की, तुम्ही सट्टेबाज असाल तर तुम्ही टीममध्ये सहभागी होऊ नये किंवा तुम्ही टीम मालक असाल सर्व नियमांची तसंच त्यापासून वाचण्याचे मार्ग तुम्हाला माहिती असते. त्यामुळे तुम्ही त्याचा दुरुपयोगही करू शकता. जर तुम्ही ट्राफिक पोलीस असाल तरी तुम्हाला सिग्नल तोडण्याचा अधिकार नाही. पण, या सवयी मात्र आपण थांबवू शकत नाही’ असं शाहरुख म्हणतोय.
राज कुंद्रा आणि शिल्पाबद्दल बोलताना शाहरुख म्हणतो, ‘शिल्पा आणि माझे चांगले संबंध आहेत. राजही माझा मित्र आहे आणि मला वाटतं राजला सट्टेबाजी करण्याची काहीही गरज नाही. मला याबद्दल पूर्ण खात्री आहे की राज या प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या तोंड देईल आणि सत्यता समोर येईल. बुकींनी केलेल्या दाव्यांची चौकशी व्हायला हवी. ’
‘सट्टेबाजीला प्रोत्साहन देणारा कुणीही असो, आपण त्याचं अजिबात समर्थन करता कामा नये, फिक्सिंग करणाऱ्यांना तर मला धोपटून काढावं वाटतंय. मी स्वत: बेटींग करणारा व्यक्ती नाही. मला रिअल रिस्क घ्यायला आवडतात. फिक्स्ड रिक्स काय कामाची? मी मजा म्हणून दिवाळीत १०० रुपयांसारख्या छोट्या रकमेचा झुगार खेळतो पण मी पैसे घेत नाही. याबाबतीत मी पूर्णत इस्लामी आहे. आपल्या फायद्यासाठी बेकायदेशीर पैसा मी कधीच घेणार नाही. आम्ही याला हरामाचा पैसा असं म्हणतो आणि असे पैसे मी कधीच घेत नाही’असंही शाहरुखनं म्हटलंय.
‘सट्टेबाजीसारख्या अवैध धंद्यांना सक्तीनं का होईना पण थांबवायलाच हवं, त्यामुळे देशाला टॅक्सच्या रुपात मोठा हिस्सा मिळेल’ असंही शाहरुखनं सुचवलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.