बाप्पाच्या निरोपाची लगबग

मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 29, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मानाचा पहिला गणपती `गणेश गल्लीचा राजा` तर पुण्यात कसबा गणपतीनेही प्रस्थान करण्यास सुरूवात केली आहे.
ढोल आणि ताशांच्या गजरात वाजत गाजत जड अंत:करणाने आज सर्व गणेशभक्त निरोप द्यायला सुरूवात झाली आहे. सकाळपासून बाप्पाचा जयघोष सुरू होत आहे. राज्यभर बाप्पांच्या विसर्जनाची जय्यत तयारी झालीये. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजचा पूर्ण दिवस विसर्जनासाठी चांगला दिसव असल्याचे सांगण्यात येत आहे. गिरगाव, कफपरेड, दादर, जुहू, पवई या आणि अशा एकूण ९९ समुद्रकिनारे, तलावांमध्ये विसर्जन. यामध्ये २७ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. २५०००पोलीस, वाहतूक पोलीस शहराच्या नाक्यानाक्यांवर तैनात असतील.
राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दंगलविरोधी पथक, होम गार्ड स्थानिक पोलिसांवर उद्याचा विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्याची जबाबदारी असणार आहे.
विसर्जनस्थळी प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक असतील. प्रथमोपचाराची सोय असेल. अपघात घडल्यास तत्काळ रुग्णालय गाठण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात असतील.
सुरक्षा आणि निगराणीसाठी पोलिसांनी प्रत्येक मोठय़ा विसर्जन स्थळावर सुमारे शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरात ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारले आहेत.