बाप्पा आले घरी...

टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 22, 2012, 12:04 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी
टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.
ज्या घरांमध्ये टिळक पंचांगाचा वापर केला जातो. त्या घरामध्ये गणरायांचं आगमन झालंय. वाजत गाजत नाही मात्र, पारंपरिक पद्धतीनं गणपतींच्या मूर्तींची प्रतीष्ठापना आज घरोघरी भक्तिभावानं करण्यात आली. भाद्रपद हा यंदा अधिक महिना असल्यानं कालनिर्णय पंचांगानुसार गणपतींचं सप्टेंबर महिन्यात आगमन होणार आहे. त्यामुळे धामधूम कमी आहे. पण टिळक पंचांग वापरणाऱ्या काही घरांमध्ये दीड दिवस तर काही घरामध्ये पाच दिवस हा गणेशोत्सव चालतो.
लहान मूर्ती आणि कमी खर्चातील सजावट हे कोकणचं जाणवणारं वैशिष्ट... ही १०० वर्षांपासून टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही जपली जातेय, हे विशेष.