www.24taas.com, झी मीडिया, अमरावती
अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.
याप्रकरणी तक्रार करण्यासाठी अभिजित अडसूळ आणि सुनील पोटे निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे. विदर्भातील अमरावती लोकसभा निवडणुकीनं अनोखा रंग घेतला आहे. राष्ट्रवादीनं नवनीत कौर राणा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आमदार रवी राणा यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळं अमरावतीत तीन वेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्यासाठी आव्हान उभं केलंय.
याचबरोबर या मतदारसंघात बसपाचे गुणवंत देवपारे, रिपाईचे राजेंद्र गवई अशी चौरंगी लढत होत आहे. यातून लढाईत अडसूळ यांचं पारडं जड असलं तरी राणा यांनी त्यांना हैराण करून सोडलंय. आता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या एका भागातील सुमारे 46 हजार नावं गायब झाल्यानं यावरून वाद सुरु झाला आहे. याबाबत शिवसेनेनं तक्रार दाखल केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.