www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मिरचा समावेश आहे. या टप्प्यात गांधी बंधुंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेलं मतदान
- जम्मू-काश्मीर-
2014- 49.98 %
2009- 45.57 %
- लेह- 75 %
- कारगिल- 65.80 %
- आंध्र प्रदेश-
2014- 76.01 %
2009- 75.86 %
- उत्तराखंड-
2014- 62 %
2009- 53.28 %
- पश्चिम बंगाल-
2014- 81.8 %
2009- 77.72 %
- उत्तर प्रदेश-
2014- 55.52 %
2009- 43.37 %
-अमेठी- 54.24 %
- बिहार-
2014- 58 %
2009- 44.07 %
- हिमाचल प्रदेश-
2014- 65 %
2009- 58.4 %
संध्याकाळी ४ वाजेपर्यंत झालेलं मतदान
पश्चिम बंगाल- ७२ %
बिहार – ५०.३९ %
आंध्रप्रदेश – ६२ %
हिमाचल प्रदेश – ४९.१४ % (३ वाजेपर्यंतची आकडेवारी)
जम्मू-काश्मीर – ३२.१३ % (३ वाजेपर्यंतची आकडेवारी)
उत्तराखंड - ४४ %
तर अमेठीमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.२२ टक्के मतदान झालं.
दुपारी 1 वाजता
पश्चिम बंगालमध्ये 1 वाजेपर्यंत 61% मतदान
सकाळी 9.30 वाजता
स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जाणारे एस एस नेगी यांनी हिमाचल प्रदेशच्या कुन्नूर इथं आपलं मत नोंदवलं. यावेळी, त्यांनी आपण 87 व्या वर्षी मतदान करू शकतो तर तरुण मतदारही करू शकतील... असं म्हणत त्यांनी तरुण मतदारांना मतदान करण्याची विनंती केली.
सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 11 टक्के मतदान झालंय. यामध्ये...
पश्चिम बंगाल : 24 टक्के
बिहार : 9.4 टक्के
उत्तर प्रदेश : 11.40 टक्के
सकाळी 9.00 वाजता
तर, राहुल गांधी, स्मृती इराणी, कुमार विश्वास यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अमेठी मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.4 टक्के मतदान झालंय.
आज आंध्र प्रदेशातील २५, बिहारमध्ये ७, हिमाचल प्रदेशात ४, जम्मू आणि काश्मिरात २, उत्तराखंडमध्ये ५, पश्चिम बंगालमध्ये ६ आणि उत्तर प्रदेशातील १५ जागांवरही मतदान होतंय. राहुल गांधी, स्मृती इराणी, कुमार विश्वास, रेवती रमणसिंह, बेनीप्रसाद वर्मा आदींसह २४३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेबरोबरच सीमांध्र विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान होत आहे. येथे लोकसभेसाठी ३३३ उमेदवार रिंगणात आहेत. आज जवळजवळ 19 करोड मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उरलेल्या 41 जागांवर नवव्या अन् शेवटच्या टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार आहे.
अमेठीतून राहुल गांधी मैदानात असून त्यांना भाजपच्या स्मृती इराणींचे आव्हान आहे. तर सुलतानपूरमधून वरुण गांधी भाजपकडून रणांगणात आहेत. तर बिहारमध्ये लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी पराभूत झालेले एलजेपीचे अध्यक्ष रामविलास पासवान हाजीपूर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत. यासह भाजपचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी सी खंडुरी आणि रमेशचंद्र पोखरियाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर सीमांध्रमधून काँग्रेसकडून केंद्रीय मनुष्य बळ विकासमंत्री पल्लम राजू हेदेखील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा मतदान केंद्रावर हल्ला
काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघात आज मतदान होत असताना एका मतदानकेंद्रावर मंगळवारी अतिरेक्यांनी हल्ला केला. राफियाबाद विभागात वाटरगमच्या एका मुलींच्या शाळेत अतिरेक्यांनी सकाळच्या वेळी पेट्रोल बॉम्बचा स्फोट केला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या निमित्तानं लोकसभा निवडणुकीत अशांतता निर्माण करण्याचा अतिरेक्यांचा आणखी एक प्रयत्न दिसून आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.