www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
गुजरात विधानसभेत आपल्या शेवटच्या भाषणात आणि निरोप समारंभात बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले, की गुजरात विधानसभा माझी पहिले विद्यालय आहे. मी विरोधी पक्षांचे आभार मानतो आणि या मोठ्या विजयाचे श्रेय विरोधी पक्षांनाही आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण देशात गुजरात मॉडलची चर्चा आहे. आज संपूर्ण देशात गुजरात मॉडल विकासाचे उदाहरण आहे.
मोदींनी शंकर सिंह वाघेला यांचे आभार मानले. वाघेलांना गर्व होईल की एक पंतप्रधान त्याच्या मोटारसायकलीवर बसला होता. वजूभाईवाला यांनी माझ्यासाठी जागा सोडली आणि माझी विकास यात्रा सुरू झाली. विकासाची यात्रा पुढेही सुरू राहिल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
एका कठीण काळात माझ्यावर गुजरातची जबाबदारी देण्यात आली. त्या जबाबदारीला मी योग्यरित्या सांभाळले. विरोधी पक्षांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. प्रत्येक पक्षाच्या आमदाराचे म्हणणे ऐकले, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाषणा दरम्यान मोदी भावुक झाले आणि म्हटले या विधानसभेत आता मी येऊ शकणार नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. माझ्या हृदयात तुम्हा सर्वांचे स्थान कायम राहणार आहे. आता मी या ठिकाणी काही विशेष कार्यक्रमावेळीच येऊ शकणार आहे. पीएमओमध्ये आता खमन आणि ढोकळा खाल्ला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी देशाच्या सेवेसाठी जात असलो तरी गुजरात विकास कायम होत राहील. गुजरातमधून मिळालेल्या संस्काराच्या आधारावर मी काम करणार आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात जनरल करियप्पा यांचीही आठवण काढली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.