लोकसभा निवडणूक : आठव्या टप्प्यातलं मतदान बुधवारी

लोकसभा निवडणुकीसाठी आठव्या टप्प्यातलं मतदान बुधवारी होतंय. त्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. निवडणुकीआधीचा काल रविवारी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2014, 08:53 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी आठव्या टप्प्यातलं मतदान बुधवारी होतंय. त्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. निवडणुकीआधीचा काल रविवारी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.
अमेठीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या सभा तसंच रोड शो झाला. तर भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत दीदींवर हल्लाबोल केला. त्यामुळं आता अखेरच्या दिवशीचे काही तास सर्वच उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी झोकून देतील.
आठव्या टप्प्यात 64 जागांसाठी मतदान होतंय. यांत उत्तर प्रदेशातील 15, आंध्रातील 25, बिहारमधील 7, हिमाचल प्रदेशात 4,जम्मू काश्मीरमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 5 तर पश्चिम बंगालमध्ये 6 जागांसाठी मतदान होतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.