हुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!

राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.

Updated: Apr 16, 2014, 09:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पद्मसिंग पाटील आदी दिग्गज नेते या टप्प्यात निवडणूक रिंगणात आहेत. यासोबत देशभरात १३ राज्यातल्या १२१ मतदारसंघांमध्ये  उद्या मतदान होणार आहे.
महाराष्ट्रातील १९ लोकसभा मतदारसंघात येत्या १७ एप्रिलला म्हणजेच उद्या मतदान होतंय. त्यामध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागलंय, पाहूयात कोण आहेत हे दिग्गज उमेदवार...
या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
* बीड - गोपीनाथ मुंडे, भाजप
* नांदेड - अशोक चव्हाण, काँग्रेस
* बारामती - सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
* हिंगोली - राजीव सातव, काँग्रेस
* पुणे - विश्वजीत कदम, काँग्रेस
* शिरूर - शिवाजीराव आढळराव, शिवसेना
* अहमदनगर - राजीव राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस
* शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस
* उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
* सोलापूर - सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस
* माढा - विजयसिंह मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस
* सांगली - प्रतिक पाटील, काँग्रेस
* सातारा - उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस
* रत्नागिरी-सिंधुदुर्ग - डॉ. निलेश राणे, काँग्रेस
* हातकणंगले - राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.