LIVE -निकाल रायगड

प्रोफाईल मतदारसंघाचं : रायगड

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 08:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
2.54 वाजता अपडेट
रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते विजयी....राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंनी जोरदार दिली टक्कर , शेवटच्या फेरीपर्यंत चुरस

1.20 वाजता अपडेट
रायगडमध्ये सुनील तटकरे 15व्या फेरीनंतर 1709 मतांची आघाडी
1.00 वाजता अपडेट
चौदाव्या फेरीत पुन्हा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी 562 घेतली आघाडी
b> 12.12 वाजता अपडेट
13 व्या फेरीत फेरीत शिवसेनेचे अनंत गिते यांची आघाडी 1506 मतांनी आघाडी
b>सकाळी 11.52 वाजता अपडेट
शिवसेनेचे अनंत गिते 12 व्या फेरीत 1624 मतांनी आघाडीवर
b>सकाळी 11.52 वाजता अपडेट
रायगडमधून पुन्हा शिवसेनेचे अनंत गिते आघाडीवर, नवव्या फेरीनंतर1835 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.50 वाजता अपडेट
सुनील तटकरे आठव्या फेरीनंतर आघाडीवर कायम, 14353 मतांची आघाडी
सकाळी 10.50 वाजता अपडेट
सुनील तटकरे सहाव्या फेरीनंतर आघाडीवर कायम, 5433 मतांची आघाडी
सकाळी 9.00 वाजता अपडेट
चौथ्या फेरीत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 63088 तर अनंत गिते58272 मते तटकरेंना 4816 मतांची आघाडी
10.20 रायगडमध्ये सुनील तटकरे तिसऱ्या फेरीत 3270 मतांची आघाडी, शिवसेनेचे अनंत गिते पिछाडीवर कायम
10.13 रायगडमध्ये सुनील तटकरे दुसऱ्या फेरीनंतर घेतली आघाडी, शिवसेनेचे अनंत गिते पिछाडीवर गेलेत
9.53 रायगडमधून पहिल्या फेरीत शिवसेनेचे अनंत गिते आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुनील तटके पिछाडीवर
9.51 रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते आघाडीवर, राष्ट्रवादीचे सुनील तटके पिछाडीवर
रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते यांनी घेतली आघाडी
मतदारसंघ : रायगड
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 64 टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
महायुती – अनंत गिते (शिवसेना)
आप – संजय अप्रांती
अपक्ष – रमेश कदम
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
अनंत गिते - शिवसेना - ४१३५४६ मतं – ५३.८९%
बॅ. ए.आर. अंतुले - काँग्रेस - २६७०२५ मतं – ३४.८०%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १३५९८३०
पुरुष : ६४३२५७
महिला : ७१६५७३
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे अनंत गिते यांना चांगले मताधिक्य मिळाले.
 अंतुले आता थकले असून, तब्येत साथ देत नसल्याने त्यांचा रायगडशी पूर्वीएवढा संपर्कही राहिलेला नाही. शेकापशी असलेली युती शिवसेनेला रायगड मतदारसंघात फायदेशीर ठरते.
 मतदारसंघात कुणबी मतदारांचे असलेले मोठे संख्याबळही शिवसेनेचे गिते यांना उपयुक्त ठरते.
 गिते यांच्याशी सामना करण्यासाठी काँग्रेसनं तटकरेंना यावेळी पुढे केलंय.
 पक्षाचे संख्याबळ वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी लढण्याची तयारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. कारण जाधव यांचा गुहागर मतदारसंघ हा रायगडमध्ये समाविष्ट होतो
 माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.