www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
2.00अपडेट
शिवसेनेचे विनायक राऊत विजयी, काँग्रेसचे नीलेश राणे यांचा धक्कादायक पराभव
1.00अपडेट
नीलेश राणेंचा पराभव दिसताच नारायण राणे यांनी दिला राजीनामा
12.00अपडेट
पुत्र नीलेश राणेंचा पराभव दिसताच नारायण राणे यांची राजीनामा देण्याची तयारी, रत्नागिरीत दिली प्रतिक्रिया
12.55 वाजता अपडेट
शिवसेनेचे विनायक राऊत यांची निर्णायक आघाडी शेवटपर्यंत कायम
सकाळी 11.55 वाजता अपडेट
10 व्या फेरीनंतर शिवसेनेचे विनायक राऊत 72,000 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.30 वाजता अपडेट
शिवसेनेचे विनायक राऊत यांची आठव्या फेरीनंतर निर्णायक आघाडी, 62 हजार 182 मतांची आघाडी , काँग्रेसेच्या नीलेश राणेंना धक्का
सकाळी 10 वाजता अपडेट
रत्नागिरी-सिंधुदुर्गातून तिसऱ्या फेरीतही विनायक राऊत 18 हजार 425 मतांनी आघाडीवर
सकाळी 9.00 वाजता अपडेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरीत 12 वाजता
9.23 रत्नागिरी-सिंधुदुर्गातून शिवसेनेचे विनायक राऊत पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत आघाडीवर
��Qb7
9.15 रत्नागिरी- सिंधुदुर्गातून शिवसेनेचे विनायक राऊत 17,000 मतांनी आघाडीवर
��Qb7
मतदारसंघ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६० टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – डॉ. निलेश नारायण राणे (काँग्रेस)
महायुती – विनायक परब (शिवसेना)
आप – कर्नल गडकरी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
नीलेश राणे – काँग्रेस – ३,५३,९१५ – ४९.२४%
सुरेश प्रभू – शिवसेना – ३,०७,१६५ – ४२.७४%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १२,५२,२५५
पुरुष : ५,८२,८६०
महिला : ६,६९,३९५
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पूर्वापार भक्कम पकड आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्य़ातील कॉंग्रेस पक्ष फारसा बलवान होऊ शकलेला नाही.
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही जिल्ह्य़ांमधून मिळून कॉंग्रेसच्या चार उमेदवारांपैकी एकटे राणेच निवडून आले. तसे असले तरी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा आणि पुण्याईचा लाभ नीलेश यांना जरूर मिळाला आहे. त्याच बळावर त्यांची राजकीय कारकीर्द चालू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबरच्या राजकीय संघर्षांत त्याचा प्रकर्षांने अनुभव आला.
शिवसेना हा उघड, तर राष्ट्रवादीचे काही प्रमुख पदाधिकारी राणेंचे छुपे शत्रू असल्याचे सर्वज्ञात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.