www.24taas.com, झी मीडिया, सांगली
दुपारी ३.०० वाजता अपडेट
Ø सांगली - भाजपचे संजय काका पाटील २ लाख ३८ हजार ९३२ मतांनी विजयी... सांगलीतल्या आत्तापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीतलं मताधिक्य तोडलं
दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø सांगली - भाजपचे संजय काका पाटील १ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर
सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø सांगली - भाजपचे संजय काका पाटील ३२,०२० मतांनी आघाडीवर
सकाळी ८.४५ वाजता अपडेट
Ø सांगली संजयकाका पाटील आघाडीवर
सकाळी ८ वाजता अपडेट
Ø मतमोजणीला प्रारंभ
Ø सांगली जिल्ह्यात शासनबंदी तर ममोजणी केंद्राजवळ जमावबंदीचे आदेश लागू.... कायदा आणि सुवव्यवस्था राखण्यासाठी एका दिवसासाठी आदेश...
Ø मतदार संघात झालेलं मतदान - १० लक्ष ४३ हजार ४६६ (६३.७१ टक्के)
Ø २४ फेऱ्यांत होणार मतदान
मतदारसंघ : सांगली
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – प्रतिक प्रकाशभाऊ पाटील (काँग्रेस)
महायुती – संजयकाका पाटील (भाजप)
आप – समीना खान
बसपा – नाना बांगर
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
प्रतीक पाटील – काँग्रेस – ३,७८,६२० मतं – ४८.७४%
अजित घोरपडे – अपक्ष – ३,३८,८३७ मतं – ४३.६२%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,९०,५७१
पुरुष : ७,६२,७८२
महिला : ७,२७,७८९
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील निवडून आले आणि केंद्रात राज्यमंत्री झाले. तरुण राज्यमंत्री म्हणून प्रतीक पाटील यांना चांगली संधी होती, पण या संधीचा त्यांना तेवढा उपयोग करता आला नाही.
चाकोरीच्या बाहेर जायचे नाही हीच पाटील यांची काम करण्याची पद्धत आहे. क्रीडा व युवक कल्याण हे खाते असताना त्यांना मतदारसंघात या खात्याचा तेवढा उपयोग करून घेता आला नाही.
नंतर त्यांच्याकडे कोळसा मंत्रालय आले. डॉ. पतंगराव कदम, विश्वजीत कदम ही स्वपक्षीय तसेच जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीची जिल्ह्य़ातील नेतेमंडळी प्रतीक पाटील यांच्या विरोधात आहेत.
पण सांगलीमध्ये काँग्रेसची पाळेमुळे वसंतदादा पाटील यांच्या पुण्याईमुळे घट्ट रोवली गेली आहेत. त्यातून काँग्रेसचा पराभव करणे सहज सोपे नाही.
गेल्या वेळी अजित घोरपडे यांना जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घोडय़ावर स्वार केले होते, पण त्याचाही उपयोग झाला नाही.
जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी विरोध केला तरीही आर. आर. पाटील हे मात्र प्रतीक पाटील यांच्या पाठीशी ठाम राहिले होते.
साखर कारखाना तोटय़ात गेला, जिल्हा बँक अडचणीत आली तरीही जिल्ह्य़ात अजूनही वसंतदादांना मानणारा मोठा वर्ग आहे.
सांगली महापालिकेची निवडणूक काँग्रेसने एकहाती जिंकली. याचाही काँग्रेसला फायदा होऊ शकतो.
सांगलीचा गड कायम राखणे काँग्रेसला जड जाणार नाही, असे एकूणच चित्र आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.