www.24taas.com, झी मीडिया, सातारा
सकाळी 2:24 वाजताअपडेट सातारा- राष्ट्रवादीचे उदयराजे भोसले 5 लाख 22 हजार 231 मतांनी विजयी
सकाळी 10:38 वाजताअपडेटसहाव्या फेरीअखेरीस उदयनराजे भोसले ८७,५९५ मतांनी आघाडीवर
मतदारसंघ : सातारा
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ५७ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
महायुती – अशोक गायकवाड (आरपीआय)
आप – राजेंद्र चोरगे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
उदयनराजे भोसले – राष्ट्रवादी – ५,३२,५८३ मतं – ६५.२२%
पुरूषोत्तम जाधव – शिवसेना – २,३५,०६८ मतं – २८.७८ %
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,४६,१४६
पुरुष : ७,७६,७८४
महिला : ७,६९,३६२
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्य़ातील असले तरी या जिल्ह्य़ाच्या राजकारणावर मुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीत.
यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केलेल्या सातारा जिल्ह्य़ातील काँग्रेसची सद्दी संपली आणि राष्ट्रवादीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आणि सारीच राजकीय समीकरणे बदलली.
राजेंच्या कलानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नमते घेतले आणि राजे यांना राष्ट्रवादीमध्ये पावन करून घेतले.
अत्यंत आक्रमक स्वभावाच्या उदयनराजे यांनी आपले रंग वेळोवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखविले.
राष्ट्रवादीचे खासदार असले तरी पक्षाच्या एकाही बैठकीला त्यांनी हजेरी लावली नाही.
मला राष्ट्रवादीची नव्हे तर राष्ट्रवादीला माझी गरज आहे, अशा आविर्भावात राजे वावरू लागले.
राष्ट्रवादीने रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याऐवजी शशिकांत शिंदे यांना मंत्रिपदाची संधी दिली.
एकूणच सातारा मतदारसंघाचे सारे राजकारण हे आले उदयनराजे यांच्यावरच आधारित आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.