www.24taas.com, झी मीडिया, शिरुर
दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø शिरुर शिवाजी आढळराव विजयी... देवदत्त निकम पराभूत
सकाळी ८.३० वाजता अपडेट
Ø शिरूमधून आढळराव पाटील आघाडीवर
मतदारसंघ : शिरुर
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ५९.५० टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – एन. डी. जयवंत
महायुती – शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
आप – जज निकम
मनसे – अशोक खंडेभराड
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
आढळराव पाटील - शिवसेना – ४,८२,५६३ मतं – ५७.५४%
विलास लांडे - राष्ट्रवादी काँग्रेस – ३,०३,९५२ मतं – ३६.२४%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १६,३०,४६६
पुरुष : ८,५९,७३०
महिला : ७,७०,७३६
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
वास्तविक आढळराव हे पूर्वी शरद पवार यांच्या निकटचे मानले जात, पण दिलीप वळसे-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे बिनसले आणि आढळराव यांनी सरळ शिवसेनेची वाट धरली.
शरद पवार हे स्वत:च या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती, परंतु राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाला नाही.
आगामी निवडणुकीत आढळराव यांचा पराभव करण्याचे राष्ट्रवादीचे ध्येय आहे, पण विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार नाहीत.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रात आपले स्वत:चे अस्तित्व तयार करण्यात आढळराव हे यशस्वी झाले आहेत. हीच बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.