www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.
राज्यातल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर मंत्र्यांचं राजीनामासत्र सुरू झालंय. मुलगा नीलेश राणेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिलाय. तर त्यांच्यापाठोपाठ नितीन राऊतांनीही राजीनामा दिलाय. पण अशा पद्धतीनं राजीनामा देणं म्हणजे पळ काढणं, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्यायत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संख्येत तुलनेने फार मोठी घट झालेली नाही. भाजपला चांगले यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीचा कौल राज्यातील जनतेने दिला व त्याचा लाभ शिवसेनेलाही मिळाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने यापुढेही एकजुटीने काम केले पाहिजे व तीच आमची भूमिका राहील. सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यातील भाजपने केली असली तरी या मागणीत अर्थ नाही, कारण या निवडणुकीला लोकसभेचा संदर्भ होता. ती केवळ राज्याची निवडणूक नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने या पराभवाची जबाबदारी घ्यावी या म्हणण्याला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेय.
महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 48 खासदार
1. उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी - भाजप
2. उत्तर पश्चिम मुंबई- गजानन कीर्तीकर - शिवसेना
3. उत्तर पूर्व मुंबई- किरीट सोमय्या - भाजप
4. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन - भाजप
5. दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे - शिवसेना
6. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत - शिवसेना
7. पालघर - चिंतामण वनगा - भाजप
8. भिवंडी - कपिल पाटील - भाजप
9. कल्याण - श्रीकांत शिंदे - शिवसेना
10. ठाणे - राजन विचारे - शिवसेना
11. रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत - शिवसेना
12. रायगड - अनंत गीते - शिवसेना
13. नंदुरबार - हिना गावित - भाजप
14. धुळे सुभाष भामरे - भाजप
15. जळगाव - ए टी पाटील - भाजप
16. रावेर - रक्षा खडसे - भाजप
17. नाशिक - हेमंत गोडसे - शिवसेना
18 दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण - शिवसेना
19. जालना - रावसाहेब दानवे - भाजप
20. औरंगाबाद - चंद्रकांत खैरे - भाजप
21. लातूर - सुनील गायकवाड - भाजप
22. बीड - गोपीनाथ मुंडे - भाजप
23. नांदेड - अशोक चव्हाण - काँग्रेस
24. हिंगोली - सुभाष वानखेडे - शिवसेना
25. उस्मानाबाद - रवी गायकवाड - शिवसेना
26. परभणी - संजय जाधव - शिवसेना
27. मावळ - श्रीरंग बारणे - शिवसेना
28. पुणे - अनिल शिरोळे - भाजप
29. बारामती - सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी
30. हातकणंगले - राजू शेट्टी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
31. शिर्डी - सदाशिव लोखंडे - शिवसेना
32. कोल्हापूर - धनंजय महाडीक - राष्ट्रवादी
33. सोलापूर - शरद बनसोडे - भाजप
34. शिरुर - आढळराव पाटील - शिवसेना
35. अहमदनगर - दिलीप गांधी - भाजप
36. सांगली - संजयकाका पाटील - भाजप
37. माढा - सदाभाऊ खोत - स्वाभिमानी शेतकरी संघटना
38. सातारा - उदयनराजे भोसले - राष्ट्रवादी
39. बुलढाणा - प्रतापराव जाधव - शिवसेना
40. अकोला - संजय धोत्रे - भाजप
41. अमरावती - आनंदराव अडसूळ - भाजप
42. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी - शिवसेना
43. वर्धा - रामदास तडस - भाजप
44. रामटेक - कृपाल तुमाले-भाजप
45. भंडारा-गोंदिया - नाना पटोळे - भाजप
46. चंद्रपूर - हंसराज अहीर - भाजप
47. नागपूर - नितीन गडकरी - भाजप
48. गडचिरोली-चिमूर - अशोद नेहते - भाजप
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.