www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
या निवडणुकीत माझी औकात दाखवून देतो, बघा कशी वाट लावतो, असा कडक इशारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपशेल तोंडावरच आपटलेत. लोकसभेसाठी राज्यात 10 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी निम्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेय.
राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढविणाऱ्या मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. भाजपशी संधान बांधताना शिवसेनेविरोधात आपले उमेदवार दिले होते. एकाच ठिकाणी भाजपच्या विरोधात मनसेनेने उमेदवार दिला होता. आपले उमेदवार निवडणून आल्यानंतर नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, असे वारंवार सांगितले. मात्र, मोदी वादळात मनसेचा सुपडा साफ झाला. त्यामुळे राज ठाकरेंना जोरदार धक्का बसला. तर शिवसेनेने सर्वच ठिकाणी बाजी मारत मनसेला चोख उत्तर दिले. त्यामुळे कोणाची औकात काय आहे, याची चर्चा सुरु झाली आहे.
मनसेचे डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार
ठाणे : अभिजीत पानसे (मते- ४८ हजार ८६३),
डिपॉझिट वाचवण्याची मतसंख्या : १ लाख ७५ हजार ६९८
भिवंडी : सुरेश म्हात्रे (मते- ९३ हजार ६४७),
डिपॉझिट वाचवण्याची मतसंख्या : १ लाख ४५ हजार ९३४
नाशिक : प्रदीप पवार (मते- ६३ हजार ५०)
यवतमाळ : राजीव पाटील - राजे (मते- २६ हजार १९४)
डिपॉझिट वाचवण्याची मतसंख्या : १ लाख ५६ हजार २३४
कल्याण : प्रमोद (राजू) पाटील (मते- १ लाख २२ हजार ३४९)
डिपॉझिट वाचवण्याची मतसंख्या : १ लाख ३७ हजार ३६६
मागील लोकसभा निवडणुकीत लाखा-लाखांची मते घेणाऱ्या मनसेने यावेळीही अपशकुन करू नये म्हणून भाजपने मनसेशी युतीची बोलणी चालवली होती. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे मनसेला युतीत स्थान मिळाले नाही. तसेच पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मोदी लाटेवर स्वार झालेल्या मतदारांनी मनसेकडे पाठ फिरवत शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकली.
मनसेचा गड असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचा कसलाही प्रभाव जाणवला नाही. नाशिक महापालिकेतील मनसेच्या ढिसाळ कारभाराचे उट्टे या निवडणुकीत नाशिककरांनी काढल्याचे बोलले जाते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.