मोदींनी आपल्या जातीचा समावेश `ओबीसी`त केला-काँग्रेस

मोदींनी हे वक्तव्य केलं आणि विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या मुद्यावर येवून थांबली.

Updated: May 10, 2014, 10:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रीपदी असतांना त्यांनी त्यांच्या जातीचा समावेश `ओबीसी`मध्ये करून घेतल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
मोदींनी हे वक्तव्य केलं आणि विकासाच्या मुद्यावर सुरू झालेली ही निवडणूक मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात जातीच्या मुद्यावर येवून थांबली.
प्रियांका गांधींनी खालच्या पातळीच्या राजकारणाचा आरोप मोदींवर केला खरा, मात्र युपी आणि बिहारला डोळ्यासमोर ठेवून मोदींनी या वक्तव्याचा खुबीनं वापर केला.
मोदींनी खालच्या पातळीच्या राजकारणाला खालच्या जातीचा रंग दिला आणि काँग्रेसची चांगलीच अड़चण झाली.
मात्र आता मोदींच्या ओबीसी असण्यावरच आता बसपापाठोपाठ काँग्रेसनंही आक्षेप घेतलाय.
मोदी हे वरच्या जातीचे असून त्यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना आपल्या जातीचा ओबीसीत समावेश केल्याचा आरोप काँग्रेसन केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.