नारायण राणे नाराज, दुसऱ्यांदा बैठकीला दांडी

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. उद्या विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी कोणाला संधी द्यायची यावरुन घोळ सुरुच आहे. तर दुसरीकडे उद्योगमंत्री नारायण राणे हे नाराज आहे. त्यांनी दुसऱ्यांदी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2014, 08:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. उद्या विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी कोणाला संधी द्यायची यावरुन घोळ सुरुच आहे. तर दुसरीकडे उद्योगमंत्री नारायण राणे हे नाराज आहे. त्यांनी दुसऱ्यांदी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.
काँग्रेसमध्ये राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरुन चांगला गोंधळ सुरु आहे. आता तर हा विस्तारच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश काही नावांवर अडून बसले आहेत, मोहन प्रकाश यांनी दिलेल्या नावावर एकमत होत नाहीत. त्यातच कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळ बैठकीला नारायण राणेंची दांडी लक्षणीय ठरली आहे.
यामुळे काँग्रेसमधील नाराजी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर तोडगा निघाला नाही, तर विस्तार रखडण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ जाहीर केल्यानंतर तो रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.