पाकिस्तानचे लोक नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची वाट पाहतायत

पाकिस्तानच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत असं वाटतं, मात्र, हा पाकिस्तान म्हणजे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एक गाव आहे.

Updated: Apr 14, 2014, 04:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
पाकिस्तानच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत असं वाटतं, मात्र, हा पाकिस्तान म्हणजे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एक गाव आहे.
पाकिस्तान नावाच्या या गावात २५० रहिवाशी आहेत, शंभर मतदार आहेत. नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पाकिस्तानच्या गावकऱ्यांनी भाजपला मतदान करण्याचे ठरवलंय.
मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या गावात आजही दारिद्र्याचे प्रमाण अधिक आहे. `नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे,` असे येथील रहिवाशांचे प्रतिनिधी हिरा हेंबरम यांनी सांगितलंय.
पूर्णिया जिल्ह्यातील संघिया पंचायतीमध्ये हे गाव येतं. पाटणापासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानात एकही मुस्लिम कुटुंब किंवा मशीद नाही. आदिवासी संथाल लोक येथे राहतात.
आपल्या देशातील शांतता भंग करणाऱ्या पाकिस्तान या शेजारी देशाला उत्तर देण्याचे काम फक्त मोदीच करू शकतात, असंही गावकऱ्यांना वाटतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.