राज ठाकरेंचा आघाडी, युतीवर हल्लाबोल

काम कसे करायचे याची झलक पाहायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या, मी नवा पर्याय दिला आहे. पुण्याच्या विकासासाठी मला सत्ता द्या, असे आवाहन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत आघाडी, युतीवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल चढवला.

Updated: Feb 11, 2012, 11:38 PM IST

www.24taas.com, पुणे

 

काम कसे करायचे याची झलक पाहायची असेल तर माझ्या हातात सत्ता द्या,  मी नवा पर्याय दिला आहे. पुण्याच्या विकासासाठी मला सत्ता द्या, असे आवाहन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आघाडी, युतीवर हल्लाबोल जोरदार हल्लाबोल चढवला.

 

 

पुण्यातील सभेला प्रचंड गर्दीत राज ठाकरे यांनी विकास कामांना कशी खिळ घातली जात आहे, यावर बोट ठेवलं. अजित पवारांवर हल्लाबोल केला. सत्ता द्या मग विकास करतो, हे अजित पवारांचे सांगणे योग्य आहे का? - सत्ता असूनही का विकास केला नाही. मतदारांनो विचार करा. पुतळा हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त असतो. मंत्र्यांच्या जमीनी कशा वाढतात, झोपड्या कशा वाढतात, अनधिकृत बांधकामे कशी वाढतात जनतेसाठी का होत नाही तसा खटाटोप. दादोजी कोंढदेवांचा रातोरात पुतळा कसा हटवला जातो, असा सवाल राज ठाकरे यांनी दिला. सार्वजनिक बाहतूक कोलमडते कशी? ठराविक उद्योगपतींनी कसा फायदा मिळेल हे पाहिले जाते, हे करतं कोण हे लक्षात घ्या, असे राज म्हणाले.

 

 

राज ठाकरे यांनी  आघाडी आणि महायुतीचा  समाचार घेतला. महायुती नव्हे ही तर अडीच युती आहे. दोन पक्ष आणि एक अर्धवट पक्ष मिळून महायुती बनली आहे.  यावेळी राज यांनी पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधलं. मुळा-मुठा नदी ही महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नदी आहे. दररोज १० हजार लीटर प्रदूषित पाणी नदीत या सोडलं जातं, असं  राज ठाकरे म्हणाले.

 

 

सरकारने नरेंद्र मोदींकडे विकास कामांसाठी क्लास लावण्याची गरज आहे. पुण्याचा विकास आराखडा अजूनही मंजूर का होत नाही. अजित पवार सत्ता कसली मागता. तुमच्या हातात सत्ता आहे ना. मग का विकास केला नाही?,  महाराष्ट्रात गुजरातपेक्षा विकासात आघाडीवर असताना राज्याला मागे कोण नेत आहे, हे लक्षात घ्य़ा. महाराष्ट्रात विकास का होत नाही मात्र, गुजरातमध्ये विकास कसा होतो, हा प्रश्न येथील राजकर्त्यांना कसं कळत नाही. त्यांचा आदर्श घ्या, राज यांनी सांगितले.

 

 

राष्ट्रकुल घोटाळ्याती आरोपी खासदार सुरेश कलमाडी यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुरेश कलमाडींवर जोरदार टीका करताना सांगितले घोटाळेबाज ९ महिन्यांनी सुटतो कसा? हे काँग्रेसचं नऊ महिन्यांचं बाळ आहे. तुरूगांत जाताना हसतं आणि सुटतानाही. तर दुसरीकडे युती करताना शिवसेना-भाजप एकत्र लढणार आणि निवडणूक झाली की सेना-राष्टूवादीबरोबर. हे कसं काय होत? हे सत्तेसाठी भूकेलेले आहेत. त्यांना जनतेचं काही नाही. आता पालिका निवडणुकीसाठी पुण्यात विधानसभेपेक्षा मनसेला जास्त मतदान होईल, यात शंका नाही, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

 राज काय म्हणालेत.. व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="45946"]

 

[jwplayer mediaid="45950"]