ठाण्यात आज राज‘गर्जना’
मुंबईत शिवाजी पार्कवर सभेसाठी कोर्टाकडून परवानगी नाकारण्यात आल्यावर राज काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे खासदार आनंद परांजपेंच्या राष्ट्रवादीशी झालेल्या सलगीनंतर शनिवारी बाळासाहेब काय बोलतात याबाबतही तर्कवितर्क लढवण्यात येतायत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सेंट्रल मैदानातल्या सभेवर सा-यांच्या नजरा असणार आहेत.
नितेश राणे कोंबडी, तर आदित्य ठाकरे मिकीमाऊस!
ठाकरे-राणे परिवाराच्या दुसऱ्या पिढीत आता चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांनी नितेश राणेंना कोंबडी म्हटले तर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सेनेचा मिकीमाऊस म्हणून जोरदार पलटवार केला आहे.
युतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती
मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.
महायुतीच्या वचननाम्यातही आश्वासनांचा पाऊस!
मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या महायुतीने आज आपला वचननामा जाहीर करून मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. शिवसेना भवनात आयोजित एका पत्रकार परिषदेत महायुतीने हा वचननामा जाहीर केला.
निकाल 'राज' विरोधी, सभा आता घेणार कधी?
शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठीची मनसेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. हायकोर्टानं मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनसेनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
कोणतेही बटण दाबा, मत राष्ट्रवादीला
कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील मतदान केंद्रांवर यंत्रात बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. मतदाराने कोणतेही बटण दाबले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळ्यालाच मत पडत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर, गावकऱ्यांनी गोंधळ घातला.
नागपुरात दारुचा मोठा साठा जप्त
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठ्या प्रमाणात दारु पकडण्यात आली.
जळगावात देवकरांच्या कार्यकर्त्यांना अटक
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकरांच्या भावासाठी पैसे वाटताना राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
विलासरांवाची नक्कल, मुंडें अडचणीत?
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी झेडपीच्या निवडणूक प्रचारात वीजचोरीचं समर्थन करणारं खळबळजनक विधान केलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे परम मित्र समजल्या जाणाऱ्या विलासरावांची नक्कल करत त्यांच्यावर टीकाही केली आहे.
झेडपी मतदानासाठी उद्या सुट्टी...
जिल्हा परिषद निवडणूक उद्या ७ फेब्रुवारी २०१२ला घेण्यात येणार आहे. महानगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजेच जिल्हा परिषद निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जाते आहे.
बीड जिल्ह्यात भाजप उमेदवारावर हल्ला
भाजप उमेदवार दशरथ वनवेंवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने तलवारीने हल्ला चढवल्याची घटना घडली.
खा.संजीव नाईक यांचा सनसनाटी आरोप
ठाण्यातली आघाडी तोडण्यासाठी शिवसेनेनं ऑफर दिल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजीव नाईक यांनी केला आहे.
आम्ही करून दाखवलं, मंत्री फेडून दाखवतात- बाळासाहेब
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आधीच रणशिंग फुकंले आहे. या निवडणुकीत बाळासाहेब यांनी प्रचाराचा नारळ या आधीच फोडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरी शैलीत विरोधकांवर टीका केली आहे.
मनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलं आहे. बोरिवलीत रोड शोच्या दरम्यान त्यांनी ही टीका केली.
'मनसे'तील बंड, अखेर झाले थंड
दादरच्या बालेकिल्ल्यात मनसे आपली बंडाळी थोपविण्यात यश आलं आहे. बहुतांश बंडोखांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर उमेदवारीपासून डावलण्यात आलेले नाराज आता राजीखूशी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचाराला लागले आहेत.
शिवसेनाप्रमुखांची तोफ ठाणे-मुंबईत धडाडणार!
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
राज यांना शिवाजी पार्क सभेची परवानगी नाही
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. पण कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्कवरच्या रस्त्यावर सभा घेणारच, असं आव्हान राज यांनी दिले आहे.
मग झक मारायला निवडणुका घेतात – राज
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी एका दिवसाची परवानगी देणार नसतील तर काय झक मारायला घ्यायच्या निवडणुका. बंद करून टाका या निवडणुका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मनसेला परवानगी नाकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
कृपाशंकर X प्रिया दत्त संघर्ष पेटलाय!
तिकीट नाकारल्यानं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खासदार प्रिया दत्त समर्थक आक्रमक झालेत. प्रिया दत्त यांच्या ऑफिससमोर समर्थक कृपाशंकर सिंहविरोधात घोषणाबाजी आणि निदर्शने करतायत.
मनपा, झेडपी मतमोजणी १७ फेब्रुवारीलाच!
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी आज येथे दिली.