आम्ही करून दाखवलं, मंत्री फेडून दाखवतात- बाळासाहेब

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आधीच रणशिंग फुकंले आहे. या निवडणुकीत बाळासाहेब यांनी प्रचाराचा नारळ या आधीच फोडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरी शैलीत विरोधकांवर टीका केली आहे.

Updated: Feb 5, 2012, 09:29 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी आधीच रणशिंग फुकंले आहे. या निवडणुकीत बाळासाहेब यांनी प्रचाराचा नारळ या आधीच फोडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या ठाकरी शैलीत विरोधकांवर टीका केली आहे. 'करून दाखवलं' या उद्धव ठाकरे यांच्या भाष्य़ाविरोधात विरोधकांनी बराच गोंधळ केला होता. झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.

 

प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली मुलाखत दिली. मंत्र्यांच्या वस्त्रहरण नाट्यावर बाळासाहेबांनी ठाकरी भाष्य केलं. 'आम्ही करून दाखवलं मंत्री फेडून दाखवत आहेत'. अशा शब्दात त्यांनी राज्यातल्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर तोफ डागली.

 

मात्र आता मनसेवर बाळासाहेब नक्की काय बोलणार? पुतणेशाहीवर काय आहे बाळासाहेबाचं मत? हे सगळं पाहता येईल झी २४ तासवर. बाळासाहेबांच्या दिलखुलास आणि तडाखेबंद मुलाखतीचा पहिला भाग उद्या संध्याकाळी साडेसात आणि रात्री १० वाजता झी २४ तासवर पाहु शकाल.