www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
उत्तर प्रदेशात यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे अनेकांच्या प्रतिष्ठेची बनली आहे. इथल्या आठ राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. १७ आणि २४ एप्रिलला होणार्या पाचव्या आणि सहाव्या टप्प्याच्या मतदानात दिग्गज राजकारण्यांचा फैसला होणार आहे.
समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील चार सदस्य निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. रामपूरच्या नवाब परिवारातील आई आणि मुलाचंही भवितव्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात शेतकर्यांची `व्होट बँक` तयार करणार्या चौधरी चरणसिंह यांचा नातू जयंत चौधरीला बदलत्या परिस्थितीत पुन्हा एकदा राजकीय ताकद सिद्ध करावी लागणार आहे.
राजकारणात मागासवर्गीयांचे महत्त्व वाढविणारे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांची पुढची पिढी यंदा आखाड्यात उतरली आहे. मुलायमसिंह यादव (सपा) यादव कुटुंबाचे आता दिल्लीच्या तख्ताकडे लक्ष लागले आहे. तिसर्या आघाडीची मोट बांधून मुलायमसिंहांना पंतप्रधान करण्याचे मनसुबे रचत आहेत. रामपूरचे नवाब कुटुंब (काँग्रेस) रामपूरच्या सईद झुल्फिखार अली खान या नवाब कुटुंबासाठी `करो या मरो` अशी स्थिती आहे. वंशपरंपरेनुसार हे घराणे राजकारणात सक्रिय आहे.
चौधरी चरणसिंह (राष्ट्रीय लोकदल) माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा मुलगा आणि केंद्रीयमंत्री अजितसिंह, नातू जयंतसिंह मैदानात उतरले. जयंतसिंहसमोर हेमामालिनी यांचं आव्हान आहे. मनेका गांधी (भाजपा) बदलत्या राजकीय परिस्थितीत मनेका गांधी यांना आवला मतदारसंघ सोडून पीलीभीत मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहे. मात्र चौरंगी लढतीमुळं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. रामवीर उपाध्याय (बसपा) माजी मंत्री रामवीर उपाध्याय यांच्या कुटुंबानं गेल्या दशकात उत्तर प्रदेशातील राजकारणात दबदबा निर्माण केला आहे.
कल्याणसिंह (भाजपा) माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना राजकीय वजन वाढविण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची आहे. राजबिरसिंह राजू भैया (मुलगा) एटा राजा भदावर कुटुंब (सपा) राजा भदावर कुटुंबातील महेंद्र अरिदमनसिंह अखिलेश यादव मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. पक्षालिकासिंह (पत्नी), फतेहपूर सीकरी इस्लाम परिवार (सपा) मायावती मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या रुहेलखंडच्या राजकीय घराण्यातील शाहजिल इस्लाम यांची पत्नी यंदा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.