राजनाथ सिंहांना हवीय नंबर दोनची जागा!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2014, 05:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचं करायचं काय, असं मोठं प्रश्नचिन्ह सध्या भाजपला आणि संघाला पडलंय. तर सरकारमध्ये नंबर दोनची पोझिशन राजनाथ सिंहांना हवीय, असं बोललं जातंय.
लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार असल्यानं एकीकडे पक्षात जल्लोषाचं वातावरण आहे. तर सरकार आल्यास लालकृष्ण अडवाणी आणि राजनाथ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना काय जबाबदारी द्यायची? अशी अडचण पक्षापुढे आहे. उपपंतप्रधानपद भूषवल्यानंतर आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये अडवाणी मंत्रीपद स्वीकारतील, अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारमध्ये न राहता ते लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळू शकतील, अशी चर्चा सुरू झालीय.
पण, अडवाणी हेच सध्या एनडीएचे अध्यक्ष आहेत. मात्र मोदींचं सरकार आल्यास दोन दोन सत्ताकेंद्र भविष्यात डोकेदुखी ठरू शकतील. त्यात मोदी हेच स्वतः एनडीए चेअरमन होण्यास इच्छूक असल्याचं समजतंय.

राजनाथ सिंहांचा इशारा राष्ट्रवादीकडे?
दरम्यान, `एनडीएमध्ये येऊ इच्छिणा-या पक्षांचं स्वागतचं होईल असं मत भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय...... राजनाथ यांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला उद्देशून असल्याचं बोललं जातयं...ते गांधीनगरमध्ये काल नरेंद्र मोदींसोबत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर बोलत होते.
वाढला भेटीगाठींचा सिलसिला?
लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजप नेत्यांच्या भेटीचा सिलसिला वाढत चाललाय. ज्येष्ठ नेत्यांचं काय करायचं? या प्रश्नावर सध्या भाजपमध्ये खल सुरू आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास संघाचे काही नेते आणि भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट झाली. त्यामध्ये संघाचे रामलाल, व्ही.सतीश आणि सुरेश सोनी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास सुलतानपूरचे भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली... तर त्यानंतर बाराच्या सुमारास उमा भारतींनी नितीन गडकरींची भेट घेतली... तर काहीच वेळात अमित शहा सव्वाबाराच्या सुमारास भाजपाध्यक्ष राजनाथ सिंहांमध्येही भेट झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.