5 गोष्टींमुळे उजळतो चेहरा

काळा चेहरा असणं कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आज गोरं दिसायचं आहे. अनेक लोक गोरं दिसण्यासाठी चेहऱ्याला अनेक प्रकारचे क्रिम लावतात पण त्याचा साईड इफेक्टही असतो. 

Updated: Dec 30, 2015, 10:15 PM IST
5 गोष्टींमुळे उजळतो चेहरा title=

मुंबई : काळा चेहरा असणं कोणालाही आवडत नाही. प्रत्येकाला आज गोरं दिसायचं आहे. अनेक लोक गोरं दिसण्यासाठी चेहऱ्याला अनेक प्रकारचे क्रिम लावतात पण त्याचा साईड इफेक्टही असतो. 

कोणत्याही प्रकारचे क्रिम न लावता तुमचा चेहरा उजळू शकतो. त्यासाठी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे. 

गाजर : गाजरमध्ये व्हीटॅमिन ए,बी,सी, कॅल्शिअम आणि प्रोटीन असतात. हे कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवते. गाजर खाल्याने केस व त्वचाला फायदा होतो.

बीट : बीटचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. जेव्हा तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण जास्त असल्यास तुमच्या त्वचेवरील काळपट पणा कमी होतो. 

पालक : व्हिटॅमिन ए,बी,सी भरपूर प्रमाणात असल्याने पालकमुळे त्वचा उजळते.

स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीमध्ये आधिक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असते. स्ट्रॉबेरी नियमित खाल्ल्याने वाढत्या वयाचा परिणाम थांबवता येतो.

सोयाबीन : सोयाबीन सेवन केल्याने पुरळ किंवा त्वचेच्या संर्दभातील समस्या दूर होतात. सोयाबीनमुळे त्वचा चमकदार बनते.