ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा...

ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय. 

Updated: Aug 5, 2015, 01:43 PM IST
ऑफिसमध्ये पुरुषांपेक्षा महिला का पडतात लवकर 'थंड'... पाहा, झाला खुलासा... title=

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये एसी सुरू असताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी का वाजते, हा अनेकदा चर्चेचा आणि गंमतीचा विषय ठरतो... तासनतास यावर चर्चाही झडतात. पण, यामागचं नेमकं कारण आता एका सर्व्हेतून उघड झालंय. 

ऑफिसमध्ये एअर कंडीशनर सुरु असेल तर ज्या तपमानात पुरुष अगदी आरामात काम करतात त्याच तपमानात महिला मात्र थंडीने कुडकुडू लागतात... त्यांचे हात-पायही थंड पडतात. म्हणजेच, ज्या तपमान पुरुषांना फार थंड वाटत नाही तेच तपमान मात्र महिलांसाठी त्रासदायक ठरू लागतं.

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत यामागचं नेमकं कारणचं उघड झालंय. बऱ्याच ऑफिसमध्ये एसी पुरुषांच्या शरीराचं तपमान ध्यानात ठेऊन सेट केले जातात, असं या सर्व्हेत वैज्ञानिकांनी स्पष्ट केलंय. हा सर्व्हे 'नेचर क्लायमॅट चेंज'मध्ये छापण्यात आलाय. 

या सर्व्हेनुसार, बहुतेकदा इमारतींचं थर्मोस्टेटस १९६० साली बनवण्यात आलेल्या मॉडलवर आधारित आहे. हे खूप जूनं आणि पारंपरिक पद्धतीनं बनवण्यात आलेलं मॉडेल आहे. यामध्ये, हवेचं तपमान आणि त्याची गती, वाष्पाचं दबाव, क्लोदिंग इन्सुलेशन इत्यादी गोष्टी ध्यानात घेऊन हे थर्मोस्टेटस सेट केलं जातं.

या पद्धतीत पुरुषांच्या मेटाबॉलिक रेटचा वापर केला जातो. त्यामुळे, या प्रक्रियेत इमारतींमध्ये सेट केलेलं तपमान पुरुषांना अनुकूल असतं पण, महिलांसाठी मात्र हे तपमान प्रतिकूल बनतं. ही पद्धत खून जुनी असल्यानं आता यात बदल व्हायला हवेत, असं यामध्ये म्हटलं गेलंय. शिवाय, तपमान थोडं वाढवल्यानं ग्लोबल वॉर्मिंगचा धोकाही कमी होऊ शकतो. 

बायोफिजसिस्ट बोरिस किंग्मा यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक इमारतींमध्ये ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक त्या तपमानाची योग्य माहिती असेल तर त्या पद्धतीनं इमारतीचं डिझाइन करता येऊ शकतं. यामुळे, ऊर्जाही कमी वापरली जाईल आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जनही कमी होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.