मुंबई: फिट राहण्यासाठी अनेक जण जीममध्ये जातात, काही जण तर औषधं घेतात, यामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. पण फिट राहण्यासाठी योगा सारखा दुसरा व्यायाम नाही. योगा केल्यामुळे तुम्ही कोणताही खर्च न करता फिट राहू शकता.
शरीराच्या प्रत्येक भागामध्ये वायू पोहोचला पाहिजे यासाठी योगा आवश्यक आहे. योगा चे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामुळे रोग बरे होतात.
सुख प्राणायाम: सुखासनमध्ये बसून असा श्वास घ्या की हवा तुमच्या पोटात गेली पाहिजे आणि श्वास सोडताना पोट खाली झालं पाहिजे. श्वास घ्यायची गती ही स्वाभाविक ठेवा.
सुख प्राणायाम केल्यामुळे शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. तसंच श्वसन तंत्रही मजबूत होतं आणि एकाग्रता वाढवायला मदत होते. सुख प्राणायाम केल्यामुळे डोक्याचा ताण, डिप्रेशन आणि हायपर टेंशनपासून मुक्ती मिळते.