उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक

हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

Updated: May 9, 2017, 04:06 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक title=

मुंबई : हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

कापलेल्या भाज्या आणि फळे हवेच्या संपर्कात आल्यास त्यातील व्हिटामिन्स आणि मिनरल्स नष्ट होतात. फळांच्या ओरिजिनल चव निघून जाते. 

पाकिटबंद ज्यूसही पिणे शरीरासाठी नुकसानकारक ठरते. यात फायबरचे प्रमाण कमी असते.     

विशेषत: उन्हाळ्यात शिळे पदार्थ खाणे टाळलेलेच बरे. शिळ्या भाज्या अथवा पदार्थ खाल्ल्यास पोटदुखीचा तसेच हगवणीचा त्रास होऊ शकतो. 

शिळे पदार्थ खाल्ल्याने गॅसचा प्रॉब्लेम सतावतो. तसेच अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता असते.