www.24taas.com, झी मीडिया, लॉस एन्जेलिस
मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.
एखादं काम पूर्ण करताना तुम्हाला तणावग्रस्त असल्याची जाणीव झाली तर मग तुम्हाला एका चांगल्या झोपेची गरज आहे, असं समजा. पण, तणावाखाली असताना कधीकधी झोपही येत नाही. तुम्हाला जर खूप चांगली झोप काढायची असेल तर नियमित नाश्ता करणं विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं पाणी पीत राहा.
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काय गिफ्ट घ्यावं बरं? किंवा त्यासाठी पैसे कुठून आणावे? किंवा ख्रिसमस पार्टीसाठी कोणता ड्रेस परिधान करावा? किंवा मिळालेली अनेक आमंत्रण स्वीकारली तर झोपेचं काय करावं बरं? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घोळत असतील. पण त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या झोपेवर लगेचच दिसून येऊ शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगली झोप प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. ख्रिसमस किंवा अशाच सणांच्या दिवशी महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याची तयारी करणं आव्हानात्मक असतं. खूप सारे कामं असतात. अनेक सूचना डोक्यात असतात. अशा वेळेस दिवसाच्या अखेरीस शांतपणे झोप घेणं थोडं कठिण असतं. पण, अशा वेळेस वेळेवर नाश्ता आणि भरपूर पाणी घेतलंत, तर तुम्हाला ही समस्या जाणवणार नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.