मुंबई : विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
'युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन'मध्ये हेच तथ्य पडताळून पाहण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. यामध्ये काही दाम्पत्यांना लग्नानंतर काढलेले आणि लग्नाच्या २५ वर्षानंतरच्या काही फोटोंचा अभ्यास करण्यात आला.
लग्नानंतर एकमेकांहून बरेचसे वेगळे दिसणारे जोडपे लग्नाच्या २५ वर्षानंतर मात्र एकमेकांना कॉम्पिमेन्ट देतील असे होते. अलिकडच्या फोटोंमध्ये या जोडप्यांमध्ये खूप समानता दिसत होती. या जोडप्यांशी संपर्क साधल्यानंतर ते आपल्या वैवाहिक जीवनात खूप खूश आहेत आणि आपल्या पार्टनरच्या वागणुकीवरही असं त्यांनी सांगितलं.
दीर्घकाळ एकमेकांसोबत राहणाऱ्या लोक एकमेकांच्या सवयी अंगिकारतात... हळू हळू कदाचित नकळत ते एकमेकांना कॉपी करू लागतात. म्हणजेच तुमचा पार्टनर खूप मस्करीच्या स्वभावाचा असेल तर तुम्हीही त्याच्यासोबत तसेच वागता.