मुंबई : तुमच्या चांगल्या तब्येतीसाठी तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी खूपच महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही काय खाताय, कसं खाताय इतकंच काय तर तुम्ही कोणत्या पदार्थासोबत कोणता पदार्थ खाताय हेदेखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.
अधिक वाचा - दररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे
तुम्ही जेवताना थंड आणि गरम पदार्थ किंवा गोड आणि नमकीन / खारट पदार्थ एकत्र खाणार नाहीत याची काळजी घ्या... अनेकदा आपण जेवताना अनेक पदार्थांवर एकाच वेळी ताव मारतो पण हे पदार्थ मात्र एकमेकांच्या अगदी विरुद्ध चवीचे असतात... अशावेळी त्याचा परिणाम आपल्या शरीराला भोगावा लागतो.
गरम आणि थंड पदार्थ एकत्र का खाऊ नयेत?
- आपल्या शरीरातील रक्त उष्ण असतं... त्यामुळे आपलं तपमान योग्य राखण्यासाठी आपल्या शरीराला दुप्पट मेहनत करावी लागते. अन्यथा, आपलं शरीर योग्य पद्धतीनं प्रतिक्रिया देण्याचं टाळू शकतं.
- आपल्या शरीराचं तपमान सामान्यत: ३७ एसी असतं. त्यामुळे जर आपण एकाच वेळ आइसक्रीम आणि हॉट कॉफी प्यायलो तर हे पचवण्यासाठी पोटाला जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल.
अधिक वाचा - अशी डायटींग बेतू शकते तुमच्या जीवावर
- योग्य पद्धतीनं पदार्थांची चव घेतली नाही तर तुमची त्वचाही रखरखीत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं तेजही कमी होऊ शकतं.
- तसंच यामुळे तुम्हाला नेहमी पोटात गॅस आणि अपचनाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे, फुफ्फुसांत कफही जमा होऊ शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.