नवी दिल्ली : फळांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. फळांमुळे फक्त उर्जाचं मिळत नाही तर फळे शरिराला फिट ठेवण्याचे कामही करतात.
आजारी माणसाठी फळे खूपचं मदतगार आहेत. रोज फळांचे सेवन करणे फारचं फायदेशीर आहे.
सगळ्या फळांमधून केळी सगळ्यात जास्त उर्जा वाढवतात. केळ्यात प्राकृतिकरित्या तीन प्रकारचे साखर मिळतात - सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज.
केळ्यात विटॅमिन ए तसेच विटॅमिन बी चे प्रमाण अधिक प्रमाणात असते. याशिवाय केळ हे उर्जेचे सगळात मोठे स्त्रोत समजले जाते.
केळ्यात कॅलेरीज ची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळते आणि शरिराला कुठल्याही कमजोरीपासून वाचवते.
जर तुम्ही दिवसभराच्या धावपळीनंतर दमला असाल तर लगेच एक केळ खा त्यामुळे रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढून शक्ती वाढेल तसेच उत्साह येईल.
केळ्यात पोटेशियमची मात्रा अधिक असते आणि सोडियमची मात्रा खूपचं कमी आहे यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
केळ्यामध्ये आम्ल तसेच अॅसिडिटी पासून वाचवण्यासाठी खूप प्रकारचे तत्व आहेत. केळ्यात फायबरचे प्रमाण खूप आहे यामुळे पाचन क्रिया मजबूत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.