मुंबई : तुम्ही पोट भरून खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा काही तरी खाण्याची इच्छा होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... कारण, या खाण्याच्या ‘व्यसना’मुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता बळावते.
लक्झमबर्ग येथील लक्झमबर्ग विद्यापीठातील मानसिक आरोग्याचे प्राध्यापक क्लॉस वोएगेल यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना खाण्याची ‘सवय’ लागते आणि महत्त्वाचं म्हणजे, याच सवयीचा त्यांना मानसिक त्रासही होऊ शकतो.
एका खाद्यसंबंधीच्या मानसिक परिक्षणांत महिलांच्या वजनांची समस्या सरासरी जास्त आहे. वोएगेल म्हणतात, ‘सगळी व्यसने एक सारखीच असतात… खाणं, जुगार खेळणं, धुम्रपान करणं, स्त्री-पुरुष संभोग किंवा मादक पदार्थांचं सेवन... या सगळ्या व्यसनांमुळे सुरुवातीला खूप तणावमुक्त आणि अधिक आरामदायक वाटतं...’
संशोधकांनी केलेल्या परीक्षणात एका कम्प्युटर स्क्रिनवर घेण्यात आलेल्या परिक्षणात गोड खाण्याचे (बर्गर, केक आणि पिझ्झा इ.) फोटो आणि अखाद्य वस्तू (मोजे, भांडी, चप्पल इ.) चे फोटो दाखवण्यात आले. परिक्षणात महिलांना खाणाऱ्या गोष्टी आणि न खाणाऱ्या गोष्टीच्या फोटोंवर क्लिक करण्याची सूचना केली. हे परीक्षण जेवल्यानंतर लगेच आणि जेवण झाल्यानंतर तीन तासानंतर केलं गेलं.
त्यानंतर संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, परीक्षणादरम्यान ज्या महिलांना जास्त वजनाची समस्या होती त्या पोटभर जेवल्यानंतरही खाण्यास उत्सुक होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.