बॉडी वाढवण्यासाठी आहाराचे हे नियम पाळा

 महिलांप्रमाणेच अनेक पुरुषांना वजन कमी असण्याची चिंता सतावत असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे डाएट चांगले असते. मात्र अनेकदा भरपूर जेवूनही वजन वाढत नसल्याची तक्रार पुरुष करतात. केवळ भरपूर जेवण केल्याने वजन वाढत जेवण करण्याचेही काही नियम असतात. चांगली बॉडी हवी असल्यास जेवण कसे करावे याचे नियमही जाणून घेणे आवश्यक असते. 

Updated: Feb 1, 2016, 12:55 PM IST
बॉडी वाढवण्यासाठी आहाराचे हे नियम पाळा title=

मुंबई :  महिलांप्रमाणेच अनेक पुरुषांना वजन कमी असण्याची चिंता सतावत असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे डाएट चांगले असते. मात्र अनेकदा भरपूर जेवूनही वजन वाढत नसल्याची तक्रार पुरुष करतात. केवळ भरपूर जेवण केल्याने वजन वाढत जेवण करण्याचेही काही नियम असतात. चांगली बॉडी हवी असल्यास जेवण कसे करावे याचे नियमही जाणून घेणे आवश्यक असते. 

१. वजन वाढवायचे असल्यास तुम्ही दिवसातून दोनदा अथवा तीनवेळा आहार घ्या. मात्र भोजन करण्याआधी अथवा नंतर वर्कआउट नक्की करा.

२. खाद् तसेच पेयपदार्थांद्वारे तुमच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण अधिक कसे जाईल याकडे लक्ष द्या

३. शारिरीक उर्जा वाढवण्यासाठी भोजनात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढवा. 

४. फॅटी पदार्थ खाण्याऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कराय 

५. नॉनव्हेज खाल्ल्यास तुमचे वजन पटापट वाढेल. 

६. वजन वाढवायचे असल्यास पापड, लोणचे, कोल्ड्रिंक्स, चिप्स जंक फूड खाणे टाळावे.