नारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते

नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

Updated: Nov 5, 2016, 09:44 AM IST
नारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते title=

मुंबई : नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

नारळ दुधात अनेक गुणधर्म आहेत. नारळ दुधात एन्टीऑक्सिडेंट, एन्टीसेप्टिक आणि शितलता देणाऱ्या गुणांबरोबर अनेक पौष्टिकतेचा खजाना असतो. त्यामुळे तुमचे केसही निरोगी राहतात. तसेच तुमची त्वचा नितळ, सुंदर आणि सौंदर्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. त्यामुळे नेहमी नारळ दूध प्राशन करा.

सकाळी 3 ते 5 मिनिटे तुम्ही नारळ दुधाने केसांचे मालिश करा. वीस मिनिटानंतर तुम्ही केस धुवू शकता. असे केल्याने केस काळे आणि दाट होण्यास मदत होते. आठवड्यातून किमान दोनदा याचा प्रयोग करु बघा. केस गळती रोखण्यासही नारळ दूध मदत करते.