उशिरापर्यंत मोबाईल वापरणे ठरु शकते हानिकारक

हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढलाय की त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसू लागलेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या अधिक वापराने लोकांचे आरोग्य बिघडू लागलेय. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानातून रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या वापराने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आलेय. 

Updated: Jan 23, 2016, 10:01 AM IST
उशिरापर्यंत मोबाईल वापरणे ठरु शकते हानिकारक title=

नवी दिल्ली : हल्ली मोबाईलचा वापर इतका वाढलाय की त्याचे परिणाम आरोग्यावरही दिसू लागलेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या अधिक वापराने लोकांचे आरोग्य बिघडू लागलेय. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानातून रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या वापराने महिलांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून आलेय. 

चांगल्या सवयींमुळे महिलांची प्रजनन क्षमता चांगली राहते आणि त्यांना गर्भधारणेत त्यांना अडथळा येत नाही. पुरेशा प्रमाणात झोप न झाल्याचा त्याचा परिणाम महिलांच्या हार्मोन्सवर होतो आणि त्याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. 

युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या ओसाका युनिर्व्हसिटी आणि जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सी यांनी मिळून याबाबत संशोधन केले. मोबाईलमधून बाहेर पडणारा कृत्रिम प्रकाश महिलांच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करतो. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल शेजारी ठेवून झोपण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला.