चांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा

मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.

Updated: Jan 22, 2016, 08:45 PM IST
चांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा title=

मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे. चांगली आणि पुरेशी झोप न मिळाल्यास चिडचिडेपणा, डोकेदुखी, सुस्तपणा असे अनेक त्रास होऊ शकतात. तेव्हा चांगली झोप येण्यासाठी हे उपाय करा.



झोपण्याआधी हे करा

झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्या. कॅल्शिअमचा स्रोत असलेले दुधात ट्रिप्टोफन आणि सेरोटोनिन ही तत्वचांगली झोप यायला मदत करतात. दुधासोबत बदाम किंवा केळं खाणेही फायदेशीर ठरू शकते. हर्बल टी सुद्धा खूप उपयुक्त आहे.



थोडासा मसाज करा

झोपण्याच्या १०-१५ मिनिटं आधी हाताला आणि पायाच्या तळव्यांना हळुवार मसाज करा. मसाज करण्यासाठी तिळाचे, बदामाचे किंवा खोबरेल तेल वापरा. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊ शकतो.



झोपण्याच्या ठीक आधी....

जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणात सूप, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. पण, आहार हलका ठेवा. जेवल्यावर लगेच आंघोळ करणेही टाळा. थोडा वेळ ध्यानधारणा करणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.



गॅजेट्सपासून दूर राहा

रात्री अंथरुणात पडल्यावर दिवसभराचे मेसेज, गेम्स आणि सोशल नेटवर्क चेक करण्याची आता आपल्याला सवय लागली आहे. पण खरे तर या गोष्टी टाळायला हव्या. झोपण्याच्या २० मिनीटे आधी टेलिव्हीजन, कॉम्प्युटर किंवा कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका. झोपताना डोळे ताणविरहीत ठेवा.

झोपताना एकूणच डोळ्यांवर प्रकाश येऊ देऊ नका.