www.24taas.com,झी मीडिया,पनामा
लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्यानुसार धूम्रपानामुळे साधारण वर्षाला ६० लोकांचा मृत्यू होतो. आणि यातील जास्त मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.
पनामा येथे भरलेल्या संमेलनात जागतिक आरोग्य संघटनेने बुधावारी एक अहवाल सादर केला. यामध्ये म्हटलंय, धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण असेच राहिले तर २०३०मध्ये ही संख्या वाढून ८० लाखापर्यंत जाऊ शकते. त्यातील ८० टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशात होतील. जर आपण तंबाखूच्या जाहिराती, त्याचा प्रचार आणि प्रायोजकतेवर जर निर्बंध घातले नसते तर तंबाखू उद्योगाने नक्कीच तंबाखू सेवन करणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले असते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालिका डॉ. मार्गारेट चान यांनी म्हटले आहे. जनतेला तंबाखू खाण्यापासून रोखले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, या वर्षी मृत्यू झालेल्या लोकांपैकी ५० लाख लोक तंबाखूचे सेवन करत होते अथवा आधी करायचे. तसेच ६,००,००० पेक्षा अधिक लोकांनी अप्रत्यक्षपणे धूम्रपानाच्या कारणाने त्यांचा जीव गमावलाय. २० शतकात साधारण १० करोड लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनाने झाला होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रिव्हेन्शन ऑफ नॉनकम्युनिकेबल डिसीझ या विभागाचे संचालक डॉ. डगलर बेचर म्हणालेत, तंबाखू नियंत्रणच्या उपायसोबतच तंबाखूवर पूर्ण निर्बंध घालणारे देश लवकरच तंबाखूचा वापर कमी करण्यात यशस्वी ठरतील. अहवालानुसार ९२ देशातील २.३ अरब लोकांना या धूम्रपानावर लावलेल्या निर्बंधामुळे फायदा झालाय. ही संख्या पाच वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. मात्र, जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त एक तृतीयांश इतकी आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.