www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पावसाळ्याच्या दिवसात तर डेंग्यू, मलेरियाचे अनेक रुग्ण आढळून येतात. मात्र या रोगांचे निदान होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेस्टही कराव्या लागतात.परंतु आता अशा कोणत्याही टेस्ट करण्याची गरज नाही.
रशियन वैज्ञनिकांनी असं एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे ज्यामुळे साधारण तासाभरात रुग्णाला कोणत्या प्रकारचा ताप आलाय याचे निदान होते. हे सॉफ्टवेअर रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे परीक्षण करते आणि त्याआधारावर रुग्णाला डेंग्यू, मलेरिया अथवा वायरल संक्रमण यांपैकी कोणत्या प्रकारचा ताप आहे याची माहिती पुरवते.
हे सॉफ्टवेअर पांढऱ्या पेशींचा आकार, कंडक्टिविटी या परीक्षणाच्या आधारावरच कोणत्या प्रकारचा ताप आहे हे ओळखते, अशी माहिती संशोधक आणि सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले डॉ. मनोरमा भार्गव यांनी दिलीय. संशोधकांनी २०१० ते मार्च २०११ दरम्यान ११५ मलेरियाचे रुग्ण, १०५ डेंग्यूचे रुग्ण आणि १०५ तापाचे रुग्ण, यासर्वांवर परीक्षा करण्यात आली. त्यानुसार अभ्यास करण्यात आला. ह्या शोधाची माहिती ‘जर्नल ऑफ हेमाटोलॉजी’मध्येही प्रकाशित करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.